Add

Add

0

माले(प्रतिनिधी):- 'निसर्गाचा -हास होतोय. पावसाचे प्रमाणही कमी होतंय. शहरातील लोक निसर्गासाठी, स्‍वच्‍छ पर्यावरणासाठी ग्रामीण भागात घरे बांधताहेत. झाडे लावण्‍यासाठी ही योग्‍य वेळ आहे. झाडे लावण्‍याबरोबरच झाडे जगवली पाहिजेत. त्‍यांची जोपासना झाली पाहिजे तर निसर्ग टीकेल.''असे प्रतिपादन मुळशी पंचायत समितीचे सभापती महादेव कोंढरे यांनी केले. टाटा पॉवर कम्‍युनिटी डेव्‍हलपमेंट ट्रस्‍टतर्फे माले (ता.मुळशी) येथे धरण भागातील शेतक-यांना कोंढरे व माजी सभापती रवींद्र कंधारे यांच्‍या हस्‍ते फळझाडे व भात बियाण्‍याचे वाटप करण्‍यात आले. यावेळी ते बोलत होते. धरण भागातील माले, शेडाणी, वांद्रे, वडुस्‍ते, भांबर्डे, शेडाणी आदी गावांतील शेतक-यांना, महिलांना आंबा, चिकू, फणस, जांभूळ, शेवगा आदींच्‍या ६५०० रोपांचे; तर कोकणातील 'जया' भाताच्‍या बियाण्‍याचे ३८० किलोचे वाटप करण्‍यात आले.  राष्‍ट्रवादीचे उपाध्‍यक्ष सुरेश जोरी, भांबर्डेचे उपसरपंच सुनील मेणे, वाघवाडीचे उपसरपंच प्रकाश वाघ, संभवेचे माजी उपसरपंच अॅड.प्रशांत जोरी, टाटा पॉवर कंपनीचे बसवराज मुन्‍नोळी, रमेश जोरी, लक्ष्‍मण ठोंबरे आदी उपस्थित होते. 

कोंढरे पुढे म्‍हणाले,''तरुणांनी नोकरीमागे न लागता शेतीपुरक व्‍यवसाय केल्‍यास कॉर्पोरेट कंपन्‍यांमधील मॅनेजर इतके उत्‍पन्‍न मिळु शकते.''
कंधारे म्‍हणाले,''पावसाचा पटटा म्‍हणुन ओळखल्‍या जाणा-या मुळशीलाही कमी होत जाणा-या पर्जन्‍यमानाचा फटका बसतोय. अवकाळी पाऊस, झाडतोडी मुळे शेतीवर परिणाम होतो. पर्यावरण जपण्‍यासाठी झाडे लावणं गरजेंच आहे. शेतक-यांना मध्‍यवर्ती ठिकाणी कृषीखात्‍यामार्फत भात बियाणे उपलब्‍ध होण्‍यासाठी पुढील वर्षी  पौड येथे जागेची व्‍यवस्‍था करु. टाटाकडून मासेमारी, बोटींग, नवीन उद्योग, धरणग्रस्‍तांचे दाखले यासाठी मागणी प्रलंबीत आहे, त्‍यासाठी माजी उपमुख्‍यमंत्री अजित पवार, खासदार सुळे यांच्‍या माध्‍यमातून प्रयत्‍न सुरु आहेत. शेतक-यांनी चारसुत्री पध्‍दतीने भातलावणी करावी.''
अॅड.प्रशांत जोरी यांनी 'कंपनीने धरणभागातील, धरणाखालील शेतक-यांना त्‍यांच्‍या मागणीप्रमाणे पाण्‍याची सोय लक्षात घेत बियाणे, वाण उपलब्‍ध करुन द्यावे.इतर सोयी द्याव्‍यात म्‍हणजे शेतक-यांचा प्रतिसाद मिळेल.' अशी मागणी मांडली.रामचंद्र दातीर यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कल्‍पना हबडे यांनी केले. दिलीप कवडे यांनी आभार मानले.

Post a Comment

 
Top