Add

Add

0
 पुणे(वि.मा.का.) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या, दि. २५ जून २०१६ रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दिल्ली येथून पुणे विमानतळावर दुपारी ३.३० वाजता आगमन होणार आहे. तेथून बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील हेलिपॅडवर ३.५० वाजता आगमन होईल. दुपारी ३.०० ते ५.१० या वेळात ते तेथे आयोजित केलेल्या स्मार्ट सिटी आणि अमृतच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभास उपस्थित राहतील. या निमित्त त्यांच्या उपस्थितीत काही उपक्रमांचे उद्घाटनही होणार आहे. कार्यक्रमानंतर ते दिल्लीस रवाना होणार आहेत.

Post a Comment

 
Top