Add

Add

0
 पुणे (प्रतिनिधी):-मांजरी येथील पत्रकार नाथाभाऊ उद्रे यांनी मटक्यावाल्याच्या विरोधात बातमी दिल्याबद्दल त्यांना नुकतीच धक्काबुक्की करण्यात आली.या प्रकरणी मांजरीतील पत्रकारांनी एकीचे दर्शऩ घडवत उद्रे यांना खंबीर साथ दिली.परिणामतः पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांच्यावर ंगभीर स्वरूपाचे गुन्हे लावले. नाथाभाऊ उद्रे यांच्या मांजरी येथील घरी जाऊन मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष तथा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी भेट घेऊन संपूर्ण पत्रकार तुमच्या पाठीशी असल्याचा विश्‍वास दिला.यावेळी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कोबल,सरचिटणीस प्रभाकर क्षीरसागर होते.यावेळी कार्यकारिणी सदस्य संदीप बोडखे,जितेंद्र आव्हाळे,राजकुमार काळभोर,विजय लोखंडे ,गणेश सातव,चेतन दिघे, शिलवंत कांबळे,सुभाष गायकवाड आदि उपस्थित होते.

Post a Comment

 
Top