Add

Add

0

माले(प्रतिनिधी):-मुळशी तालुक्यातील  तिस्‍करी येथील गणपत खंडू वाशिवले यांची शिवसेना मुळशी तालुका समन्‍वयक पदी निवड करण्‍यात आली.
बारामती लोकसभा मतदारसंघाचे सपंर्कप्रमुख सत्‍यवान उभे यांनी त्‍यांना नुकतेच निवडीचे पत्र दिले. सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब चांदेरे, जिल्‍हाप्रमुख दत्‍तात्रेय टेमघरे, जेष्‍ठ नेते बबनराव दगडे,मुळशी तालुकाप्रमुख प्रकाश भेगडे,उपतालुकाप्रमुख अनिल आधवडे, विभागप्रमुख सचिन पळसकर यांच्‍या उपस्थितीत पत्र देण्‍यात आले.

Post a Comment

 
Top