Add

Add

0
विश्र्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूह, पुणेतर्फे आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त योग प्रशिक्षण शिबीराचे आयोजन (सुमारे 10 ते 11 हजार विद्यार्थीसहभागी होणार

पुणे(प्रतिनिधी):- संयुक्त राष्ट्र संघाच्यानिर्णयानुसार 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.विश्र्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूह, पुणेतर्फे आंतरराष्ट्रीय योगिदनाचे औचित्य साधून  दि.21 जून 2015 रोजी सकाळी 7.00 ते 9.00 वाजेपर्यंत कोथरूड येथील माईर्स एमआयटीच्या प्रांगणात योग प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 
या शिबीराच्या निमित्त माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व सुमारे 10 ते 11 हजार विद्यार्थी या योग प्रशिक्षण शिबीरात सहभागी होणार आहेत.
योगाचार्य श्री. मारुती पाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे योग प्रशिक्षण शिबीर संपन्न होणार आहे.याप्रसंगी शार्प इंडिया प्रा.लि चे व्यवस्थापकीय संचालक टोमियो इसोगाई व जपानीज क्लीग्राफार कझुको बारिसिक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत . 
विश्र्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे भारततर्फे 1996 सालापासून दरवर्षी  24 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या दरम्यान शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांच्याकरीता  योग प्रशिक्षण कार्यशाळा घेतली जाते. 1983 सालापासून एमआयटी संस्थेच्या प्रांगणात धूम्रपान करण्यास बंदी आहे. 
विद्याथ्र्यांचा सर्वांगीण विकास  व चारित्र्य संवर्धन व्हावे, यासाठी योगाला नेहमीच प्रोत्साहन दिले जात आहे. 
आजची तरुण पिढी चंगळवादी व व्यसनाधीन झालेली आहे. या पिढीची बौध्दिक व शारीरिक उन्नती व्हावी, यासाठी दररोज योगसने करावीत. यासाठी एमआयटीने आयोिजत केलेल्या योग प्रशिक्षण शिबीराचे वि शेष महत्त्व आहे, असे मत योगाचार्य श्री.मारुती पाडेकर यांनी व्यक्त केले. 
माईर्स एमआयटीच्या प्रांगणात आयोिजत करण्यात असलेल्या या योग प्रशिक्षण शिबीरात  जास्तित जास्त लोकांनी विशेषतः विद्यार्थ्यानी सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्र्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्र्वनाथ दा. कराड यांनी केले आहे.      

Post a Comment

 
Top