Add

Add

0

मालेप्रतिनिधी):- जागतिक पर्यावरण दिना निमित्त ग्रामपंचायत वांद्रे (ता.मुळशी) अंतर्गत आहिरवाडी येथे 'तेर' या सामा‍जिक संस्‍थेच्‍यावतीने विहिरीचे भुमीपूजन व ५० सौरदिव्‍यांचे वाटप करण्‍यात आले. फ्रेंचभाषेमध्‍ये 'तेर' म्‍हणजे पृथ्‍वी. पर्यावरण विषयक जनजागृती व शैक्षणिक क्षेत्रात मार्गदर्शन करणा-या पुणे येथील 'तेर' या संस्‍थेमार्फत जिल्‍हयाच्‍या ग्रामीण भागात विविध कामे, ग्रामस्‍थांमध्‍ये जन जागृती करण्‍यात येते. या संस्‍थेमार्फत दुर्गम वांद्रे ग्रामपंचायतीतील आहिरवाडी येथे पिण्‍याच्‍या पाण्‍याची समस्‍या सोडविण्‍यासाठी विहिर खणण्‍याच्‍या कामाचे भुमिपूजन करण्‍यात आले. तसेच पाण्‍याचा टॅंकरही सुरु करण्‍यात आला. आहिरवाडी गोरे वस्‍ती, धनगर वस्‍ती, गोठे येथील कातकरी वस्‍ती येथे सुमारे पन्‍नास सौर दिव्‍यांचे वाटप करण्‍यात आले.

 यावेळी संयुक्त राष्ट्र पर्यावरण संघाचे माजी संचालक राजेन्द्र शेंडे, युनेस्को दिल्ली प्रादेशिक संचालक डॉ.रामबुझ, तेर पॉलिसी सेंटर संस्‍थापक अध्यक्ष डॉ.विनिता आपटे, वांद्रेचे उपसरपंच लहू वाळंज, तंटामुक्‍ती समितीचे अध्‍यक्ष धुळाजी कोकरे, गोमुख संस्‍थेचे जालिंदर ढमाले आदी उपस्थित होते. शेंडे, रामबुझ, आपटे आदींनी पर्यावरण संवर्धन विषयक मार्गदर्शन केले. 
कातकरी महिलांनी जागा जमिनी नसल्‍याने कोंबडीपालनासाठी मदत मिळण्‍याची अपेक्षा व्‍यक्‍त केली. 'कोंडिबा झोरे यांनी विहिरीसाठी जागा दिली.विहिर बांधून झाल्‍यावर टाकीच्‍या मदतीने गोरेवाडा, वस्‍ती, गोठे आदी परिसरातील ग्रामस्‍थांना पाणी पुरवठा करण्‍यात येणार आहे.' अशी माहिती वाळंज यांनी दिली. 

Post a Comment

 
Top