Add

Add

0
     "भारत नेट"च्या पथदर्शी प्रकल्पामध्ये समावेश;प्रधान सचिव गौतम यांची माहिती … 
पुणे(प्रतिनिधी):-'पंतप्रधानांच्या महत्वांकाशी डिजीटल इंडिया कार्यक्रमांतर्गत देशातील 28 हजार ग्राम पंचाय तीना भारतनेट उपक्रमाद्वारे इंटरनेटद्वारे जोडण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने याच धर्तीवर डिजीटल महा
राष्ट्र कार्यक्रम सुरु केला आहे. भौगोलिक परिस्थती आणि इतर वैशिष्टयामुळे अन्य शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी मुळशी तालुक्याचा पथदर्शी प्रकल्पामध्ये समावेश केला असल्यामुळे इंटरनेटद्वारे ग्राम पंचायती जोडण्याच्या पथदर्शी कार्यक्रमामधे मुळशी तालुक्याचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांनी आज मुळशी येथे आयोजित बैठकीत दिली.
 यावेळी माहिती तंत्रज्ञान विभागचे संचालक एम. शंकरनारायण, भारतनेटचे मुख्य सर व्यवस्थापक ए.के.सक्सेना, सरव्यवस्थापक संजय सेठी, उपजिल्हाधिकारी रामदास जगताप आदी उपस्थित होते.
   ग्रामीण भागातील जनतेला पर्यावरणपूक आणि आरोग्यदायी जीवन जगता यावे यासाठी केंद्र आणि राज्य शासनानी विविध योजना जाहिर केल्या आहेत. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि योजनांचा लाभ थेट ग्रामीण जनतेपर्यत पोहोचावा, यंत्रणेतील दोष दूर व्हावा यासाठी देशभरातील 28 हजार ग्राम पंचायतींना इंटरनेटद्वारे जोडण्याची योजना आखण्यात आली आहे. या योजनेसाठी सुमारे आठ हजार तीनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून या योजनेद्वारे ग्रामीण भागात 14 एमबीपीएस गतीने डाटा वहन करण्याची यंत्रणा उभारण्यात येत असल्याची माहिती यावेळी विजयकुमार गौतम यांनी यावेळी दिली.
 या योजनेमुळे ग्रामीण भागातील जनतेला इ-हेल्थ, इ-क्लासरुम, इ-चावडी व अन्य योजनांचा लाभ मिळण्यास मोठी मदत होणार आहे. सध्याच्या विद्युत वितरण प्रणालीच्या जाळयांचा वापर करुन इंटरनेट सेवा पुरविण्यात येणार असल्याचे श्री गौतम यांनी सांगितले. यासाठी वीज वितरण प्रणालीतील सर्व खांबांचे जीओ-टॅगींग करण्यात येणार आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे ॲपची निर्मिती करण्याबरोबरच संगणकीय प्रणाली निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी विजयकुमार गौतम यांनी दिली. मुख्यमंत्रयांच्याहस्ते महाराष्ट्र दिनापासून नागपूर विभागातील पाच ग्राम पंचायतींमध्ये प्रायोगिक तत्वावर  ही सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी तालुकयातील सर्व अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक कार्य करावे अशी सूचना केली.
   यावेळी विद्युत वितरण प्रणालीतील खांबांचे जीओ-टॅगींग करण्यासाठी प्रत्यक्ष सर्वेक्षणालाही सुरुवात करण्यात आली. या बैठकीला महावितरण मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता एम.डी.चौधरी, तहसीलदार बालाजी ढगे, महावितरण व बीएसएनलचे वरिष्ठ अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी उपस्थित होते.

0000

Post a Comment

 
Top