Add

Add

0
हिंजवडी(प्रतिनिधी):- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले मुळशीतील काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष पैलवान दिलीप हुलावळे यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.पक्षाचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते हुलावळे यांना निवडीचे पत्र दिले आहे. 
    हुलावळे हे गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून काम करीत होते. मात्र काँग्रेसमध्ये त्यांना योग्य तो मानसम्मान मिळत नसल्याने व निर्णय प्रक्रियेत डावलले जात असल्याने त्यांची कुंचबणा होत होती. गेल्या वर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर गावातील राष्ट्रवादीच्या पॅनेलशी ते संलग्न असल्याने तेव्हा पासून ते राष्ट्रवादीच्या मागावर होते. अखेर दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील चांदेरे व युवा नेते सुरेश हुलावळे यांच्या मध्यस्थीने त्यांनी अजित पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानुसार त्यांच्यावर जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 
आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवा दीची ताकद वाढविण्यासाठी ही निवड महत्वाची मानली जात आहे. त्यांच्या निवडीचे हिंजवडीकरांमधून जोरदार स्वागत होत असून हिंजवडी ग्रामपंचाय तीचे पहिले दिवंगत सरपंच बबनराव हुलावळे यांचा त्यांना वारसा लाभलेला आहे. त्यांच्या सौभा ग्यवती बेबी हुलावळे देखील हिंजवडी ग्रामपंचायतीवर निवडून आल्या आहेत. पुणे  जिल्ह्यात अव्वलस्थानी असले ली पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी तसेच पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या संधी चे सोने करणार असल्याचे त्यांनी निवडीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. 

Post a Comment

 
Top