Add

Add

0
किसानपुत्र आंदोलने, पुणेतर्फे रविवारी शेतकरीविरोधी कायदे परिषदेचे आयोजन
पुणे(प्रतिनिधी):- दुष्काळाच्या झळा, नापिकी,कर्जबा जारीपणा याने पिचलेल्या शेतकर्‍यांना कायद्या नेही वाळीत टाकले आहे.शेतकरीविरोधी कायद्यांमुळे शेतक र्‍यांच्या शोषणात अधिकच भर पडली.परिणामी, देशा तील पाच लाखांपेक्षा अधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि हे आत्महत्यांचे सत्र अद्यापही सुरुच आहे. त्यामुळे नेमके हे शेतकरीविरोधी कायदे समजून घेऊन शेतकर्‍याला दिलासा देण्याच्या उद्दे शाने ‘किसानपुत्र आंदोलन’ या सामाजिक संस्थेतर्फे रविवार, दि.१९ जून २०१६रोजी सायंकाळी ६.०० वाज ता पत्रकारभवन, नवी पेठ,येथे ‘शेतकरीविरोधी कायदे परिषद’ आयोजित करण्यात आली आहे.
या परिषदेत वर्धा येथील कायद्याचे अभ्यासक  दिनेश शर्मा, औरंगाबाद उच्च न्यायालयातील वकील ॲडमहेश भोसले आणि पुण्यातील कायदेअभ्यासक  महेश धुके हे शेतकरीविरोधी कायद्यांविषयी मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेच्या अध्यक्षस्थानी किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब, तर प्रमुख पाहुणे म्हणून अच्युतराव गंगणे उपस्थित राहणार आहेत. शेतकर्‍यांविषयी काही करावेसे वाटत असणार्‍या आणि शेतकर्‍यांच्या मुलांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आल्याची माहिती परिषदेचे निमंत्रक संतोष उमाटे, सदस्य जीवराज चोले यांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी ९४२२४०९३५० अथवा ९७६७७८९५२९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Post a Comment

 
Top