Add

Add

0
माले(प्रतिनिधी):- सर्वांगीण ग्रामीण विकास संस्था व टिळक महाराष्ट्रश विद्यापीठ सांगली कॅम्पस यांच्‍यावतीने माले (ता.मुळशी) येथे लहान मुलांसाठी आयोजीत एक दिवसीय शिबिर संपन्‍न झाले. माले, संभवे, दिसली येथील चौथी ते सातवीच्‍या चाळीस मुला, मुलींनी शिबिरात सहभाग घेतला.

या एक दिवसीय शिबिरामध्ये  मुलांना योगासने, प्राणायाम, विविध बैठे खेळ, गाणी इत्‍यादी शिकवण्‍यात आले. योग वेदांत सेवा समिती पुणे यांच्या मार्फत ‘मातृ-पितृ पुजन दिवस’ या कार्यक्रमाचे आयोजन संजी गोदारिया, श्रीकांतभाई यांनी केले. व्‍हलेंटाईन डे सारखे पाश्‍चात्‍य डे साजरे करण्‍याऐवजी मातृ-पितृ पुजनाद्वारे आई-वडिलांचा आदर करण्‍याचे आवाहन केले. एकदिवसीय शिबीरास वर्षा सावंत, राधिका झांबरे, स्वाती कदम, सचिन  आकरे यांचे मार्गदर्शन लाभले. शिबिराचा समारोप एकत्रीत पसायदानाने झाला. आयोजन टिळक महाराष्ट्र विद्यापीठ सांगली कॅम्पसच्‍या समाजकार्य (MSW) विभागाच्या विद्यार्थीनींनी केले होते.

Post a Comment

 
Top