Add

Add

0
       नगरविकास खात्याचा निर्णय; 
         हिंजवडीतील प्रस्तावित आयटी पार्क रस्ता
पुणे (प्रतिनिधी):- हिंजवडी येथील राजीव गांधी माहि ती-तंत्रज्ञान पार्क (आयटी पार्क) जाण्यासाठी आखण्या त आलेल्या रस्त्यांसाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीच्या मोबदल्यात जागामालकांना मंजूर विका स नियंत्रण नियमावलीप्रमाणे चटईक्षेत्र (एफएसआय) देण्याचा निर्णय नगरविकास खात्याने घेतला आहे. 
वाहतूक कोंडी टाळून आयटी पार्कमध्ये प्रवेश करण्या साठी पर्यायी रस्ता करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र औद्यो गिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) दिला आहे;तसेच हा रस्ता पुणे जिल्ह्याच्या प्रादेशिक योजनेत समाविष्ट करून त्याची आखणी करण्याची विनंती नगरविकास विभागाला करण्यात आली होती. या रस्त्यासंदर्भात "सकाळ‘नेही पाठपुरावा केला होता. त्याची दाखल घेत नगरविकास खात्याने त्यास नुकतीच मंजुरी दिली. 

या पर्यायी रस्त्यासाठी खासगी मालकांची जमीन संपादन करावी लागणार आहे. ही जमीन संपादित करण्याच्या मोबदल्यात संबंधित जागामालकांना प्रादेशिक योजनेच्या मंजूर विकास नियंत्रण नियमावलीनुसार चटईक्षेत्र निर्देशांक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित प्राधिकरणांनी ही जमीन संपादित करून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे रस्ते विकसनासाठी हस्तांतर करावी, अशीही सूचना करण्यात आली आहे. मात्र, जमीन देण्यास विरोध झाल्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमातील तरतुदींनुसार जमीन संपादित करण्यात यावी, असे नगरविकास विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

 
Top