Add

Add

0

jitendra joshi drem

सच्चा कलाकार किंवा कोणतीही व्यक्ती आयुष्यभर विद्यार्थी असते. काही गोष्टी जमत नसतात तेव्हा ते ठामपणे प्रेमाने, ओरडून शिकवणारे शिक्षक असतात. काहीवेळेला स्वप्नातही ते आपला पिछा सोडत नाही असंच काहीस जिंतेद्र जोशीचं झालं आहे. त्याने असाच एक किस्सा सोशल नेटवर्किंगवर शेअर केला आहे. किस्सा जरूर वाचा त्याच्याच शब्दात.
जितेंद्र जोशी
हम तो तेरे आशिक़ हैं या संजय मोने लिखित - दिग्दर्शित नाटकाची रिहर्सल करताना रोज रात्री झोपेतून अचानक जाग येत असे कारण रोज स्वप्नं पडायची आणि मला काम जमत नाहिये म्हणून मोने काका स्वप्नात ओरडायचा आणि खूप दडपण यायचं नाटकाच्या दिवसभरातल्या तालमींचं अर्थात त्यामुळे नवखेपणा जपला जातअसे . त्यावेळी या स्वप्नांचा कंटाळा यायचा परंतु हळूहळू सरावाने असेल, कामाच्या प्रमाणामुळे असेल किंवा सोबतीमुळे असेल एक बनचुकेपणा येत गेला आणि ती भीती , ती स्वप्ने त्यानंतरची कामं करताना हळूहळू नाहीशी झाली. अर्थात एक माणूस म्हणून आणी खूप मोठा नट म्हणूनही मोनेकाका सर्वार्थाने जवळ राहिला आणि वेळोवेळी शिकवत राहिला, चार समजुतीच्या गोष्टी सांगत राहिला. हे सर्व लिहिण्याचं कारण म्हणजे आज खूप वर्षांनी पुन्हा एकदा तसंच स्वप्न दिसलं - मला संवाद नीट म्हणता येत नव्हते आणि सीन जमत नव्हता म्हणून मोनेकाका चिडला होता आणि मी घाबरून जागा झालो आणि लक्षात आलं . आपण कितीही मोठे झालो(वयाने आणि आपल्या कार्यक्षेत्रात) तरी आपल्याला संपूर्ण ओळखणारा आणि आपल्याला ज्याचं ऐकावंसं वाटेल अशा ताकदीचा आणि हक्काचा प्रेमाचा माणूस असेल तर तुमचं नवखेपण जपता येऊ शकतं आणि चांगलं काम जमेल की नाही ही भीती सुद्धा!

Post a Comment

 
Top