Add

Add

0
पौड(प्रतिनिधी):-पुणे येथील हेलिबर्टन या आय.टी. कंपनीतील 10जणांच्‍या ग्रुपने पौड येथील दिशा केंद्राला दिनांक 11 जून रोजी भेट दिली व वनविभागाच्‍या जागेत वृक्षारोपन केले. यात 10फुट उंचीचे एक वडाचे, 5फुट उंचीचे 1आंब्‍याचे व उर्वरित 8 रोपे ही शेवग्‍याची लावली रोपाचे संरक्षण व्‍हावे याकरिता लोखंडी ड्रम तसेच जाळी बसवण्‍यात आली.
हेलिबर्टन या कंपनीतील स्‍वप्निल डफळ हा कार्यकर्ता लावलेल्‍या रोपांचे संगोपन कसे होत आहे याची पाहणी करणार आहे. रोपासाठी लागणारे खत – औषधे आमचा ग्रुप देईल. दर दोन महिन्‍यातून एकदा आम्‍ही नक्‍कीच या ठिकाणी येऊन वृक्षांची पाहणी करु असे ते म्‍हणाले.
 दिशा केंद्रातील मुलांशी त्‍यांनी संवाद साधला. त्‍यांनी मुलांना गुळ शेंगदाणे हा पौष्टिक खाऊ दिला.

 वृक्षारोपन या कार्यक्रमासाठी हेलिबर्टन या आय.टी कंपनीतील 10स्‍वयंसेवक, डोनेटेड या संस्‍थेचे अध्‍यक्ष श्री.नितीन घोडके, जीवन संवर्धन फाऊंडेशनचे कार्यकर्ते सचिन आकरे व सारिका नखाते उपस्थित होते

Post a Comment

 
Top