Add

Add

0
बालगंधर्व परिवाराच्या वतीने ज्येष्ठअभिनेते राघवेंद्र (अण्णा)कडकोळ यांनाजीवनगौरव पुरस्काराने सन्मानित 
पुणे(प्रतिनिधी):- बालगंधर्व रंगमंदिराच्या 49व्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व परिवाराच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र (अण्णा) कडकोळ यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कडकोळ यांनी आजवर शंभरपेक्षा जास्त मराठी चित्रपटांमधून भूमिका साकारल्या आहेत.मराठी नाटकांचे सात हजा रांहून अधिक प्रयोग सादर केले आहेत. 
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे उद्‌घाटन शनिवारी दि. 25 रोजी सकाळी होणार असून, त्यावेळी कडकोळ यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.विविध कलाप्रकारांतील ज्येष्ठ आणि युवा कलावंतांनाही गौरवण्यात येणार आहे.यावेळी एकपात्री कलाकार संघातर्फे "रंग एकपात्रीचे‘हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. उद्‌घा टन सोहळ्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, सिनेकलाकार महेश मांजरेकर, सुशांत शेलार, वर्षा उसगावकर आदी उपस्थित राहणार आहेत. 
महोत्सवात सेलिब्रिटींचा कॉमेडी शो, महेश मांजरेकर आणि राहुल रानडे यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम रंगणार आहे. दुसऱ्या दिवशी जादूगर ईश्वर हे जादूचे प्रयोग सादर करणार आहेत. यानंतर फक्त महिलांसाठी "लावणी महोत्सव‘ आयोजित करण्यात आला आहे. रविवारी दि 26ला सायंकाळी चार वाजता आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची प्रकट मुलाखत होणार आहे. सायंकाळी सव्वासहा वाजता ज्येष्ठ साहित्यिकविश्वास पाटील यांच्याशी राज काझी संवाद साधणार आहेत, असे बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी परिवाराचे नितीन मोरे, संदीप पळेवाले,सिद्धार्थ शहा,अनिल काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. 
बालगंधर्व हे नाट्यगृह आहे की सभागृह? 
राजकीय कार्यक्रमांमुळे बालगंधर्व रंगमंदिरातील सांस्कृतिक कार्यक्रम रद्द किंवा पुढे ढकलले जाण्याच्या घटना या वर्षभरात अनेकदा घडल्या आहेत. कलादालनाचे आगाऊ बुकिंग करूनही राजकीय नेत्यांच्या दबावापायी सामान्य कलाकारांचे नुकसान होत आहे. बालगंधर्व हे नाट्यगृह आहे की सभागृह, असा सवाल करत याबाबतची याचिका आठ-दहा दिवसांत धर्मादाय आयुक्तांकडे दाखल करणार असल्याची माहिती बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

भोसले म्हणाले, ""अनेक तक्रारी आल्यानंतर माजी महापौरांनी बालगंधर्व रंगमंदिरातील सांस्कृतिक कार्यक्रम राजकीय दबावामुळे रद्द केले जाणार नाहीत, असे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतरही या घटना सुरूच राहिल्या. या प्रश्‍नावर उपाय म्हणून आयुक्तांकडे याचिका दाखल केली जाणार आहे.‘‘ 

Post a Comment

 
Top