Add

Add

0
 पौड (प्रतिनिधी):-आपल्या वाढदिवसावरील अनाठायी खर्चाला फाटा देत मुळशीतील पत्रकारांना नित्याच्या वापरासाठी लागणारी इंटरनेट सुविधा स्वखर्चाने उपलब्ध करून देत मुळशीतील राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते दिलीप हुलावळे यांनी एक अनोखा सामाजीक उपक्रम राबविला.त्यांच्या या मदतीमुळे राज्यात तालुकास्तरावर उभार लेले मुळशीतील पहिले पत्रकार भवन २४ तास वायफाय सुविधेने जोडले गेले आहे.या वायफाय यंत्रणेचा शुभारंभ हुलावळे यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधून करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या स्वाती हुलावळे, महिला बालकल्याणच्या माजी सभापती लक्ष्मीबाई सातपुते, मुळशीच्या माजी सभापती उज्वला पिंगळे,भोर वेल्हा मुळशीतील राष्ट्रवादीचे युवा नेते सुरेश हुलावळे, राष्ट्रवा दीच्या महिला तालुकाध्यक्षा चंदा केदारी तसेच जिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारणी सदस्य व पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र मारणे, पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष व पत्रकार संघाचे सल्लागार दत्तात्रय सुर्वे, नवनिर्वाचीत अध्यक्ष रमेश ससार, उपाध्यक्ष सचिन वीटकर, कार्याध्यक्ष किसन बाणेकर आदी उपस्थित होते. 
या उपक्रमाबाबत माहीती देताना हुलावळे म्हणाले, 'तालुक्यातील पत्रकार वेगवेगळ्या भागात फिरून बातम्या संकलीत करीत असतात. या ठिकाणाहून वेळेत इंटरनेट सुविधा नसल्याने अनेकदा महत्वाच्या बातम्या छापून येण्यास विलंब होतो. पत्रकारांची ही व्यथा समजल्याने त्यांची गैरसोय दुर होण्यासाठी संपूर्ण वर्षभराच्या इंटरनेट खर्चाची जबाबदारी घेतली आहे'.

Post a Comment

 
Top