Add

Add

0
मुंबई (प्रतिनिधी) :- अनेक दिवसांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला असून येत्या आठवडाभरात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कर ण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले. गेल्या दीड वर्षापासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, याकडे भाजप तसेच युतीच्या घटक पक्षांचे लक्ष लागले आहे.महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे तब्बल 12खात्यांचा कार्यभार होता. त्यांच्या राजीना म्यानंतर ही खाती सांभाळण्यासाठी नवीन मंत्र्यांचा समावेश करणे आवश्यक झाले आहे शिवाय गेले वर्ष भर मंत्रिपदासाठी बाशिंग बांधून बसलेल्या मित्र पक्षांचा संयम संपला आहे . 
त्यामुळे विस्ताराची मागणी जोर धरत होती. खडसे यांच्या गच्छंतीनंतर मुख्यमंत्र्यांनी सरकारवरील आपली मांड अधिक पक्की केली असून ही संधी साधत मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्याचाही त्यांचा प्रयत्न सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर आज पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विस्ताराबाबत विचारले असता आता पर्यायच राहिलेला नाही. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आधीच म्हणजे साधारणतः या आठवडाभरात तो करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला कॅबिनेट मंत्रिपद देणार का?असा प्रश्न केला असता मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारमध्ये त्यांना सहभागी करून घेताना एक लिखित करार करण्यात आला आहे. 
त्यात त्यांना 12 मंत्रिपदे देण्यात येतील व कोणती खाती दिली जातील, हे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार विस्तारात शिवसेनेला वाटा दिला जाईल त्यापेक्षा अधिक देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवी मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपशी युती नको, असे कुठेही म्हटलेले नाही. त्यांच्या एकंदर भाषणातून युतीसाठी दरवाजे खुले असल्याचेच दिसून येत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढावाव्यात, अशी भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांत काम करणा-या कार्यकत्र्यांची मागणी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

Post a Comment

 
Top