Add

Add

0
‘पर्यावरण रॅली स्पर्धे’मध्ये हडपसर विधानसभा मतदार संघाचा प्रथम क्रमांक

पुणे :-‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पर्यावरण दिनाचा कार्यक्रम घेतला तो स्तुत्य आहे. राष्ट्रवादी पेक्षा इतके इतर कोणत्याच पक्षात पर्यावरण जागृती विषयक कार्यक्रम होताना दिसत नाही. पर्यावरण विषयक जागरूकता ही झालीच पाहिजे.’ असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
  पर्यावरण रॅलीमध्ये आठ विधानसभा मतदार संघामध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये हडपसर विधानसभा मतदार संघाला प्रथम क्रमांक मिळाला आहे, तर कसबा विधानसभा मतदार संघाला द्वितीय, पर्वती विधानसभा मतदार संघाला तृतीय, तर कोथरूड विधानसभा मतदार संघाला चौथे क्रमांकाचे बक्षिस मिळाले. विजेत्यांना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्हे देवून  गौरविण्यात आला. 
पर्यावरण दिनानिमित्त पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पर्यावरण रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त आठ विधानसभा मतदार संघ निहाय आकर्षक रॅली, आकर्षक देखावे, नवीन संकल्पना याविषयी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  पक्षाच्या शहराध्यक्ष खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली पर्यावरण दिनी गरवारे बालभवन पासून ते शनिवारवाड्यापर्यंत काढण्यात आली होती.
या रॅलीमध्ये चित्ररथ, पर्यावरण संवर्धन, सौरउर्जेचा वापर, पर्यावरण दिंडी, कचरा व्यवस्थापन, पर्यावरण विषयी जागृती करणारे जिवंत देखावे, पर्यावरणाचे संदेश देणारे फलक कार्यकर्त्यांनी हातात धरले होते. 
रॅलीमध्ये खासदार शहराध्यक्ष वंदना चव्हाण, महापौर प्रशांत जगताप, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते बंडू केमसे, माजी आमदार कमल ढोले-पाटील, माजी महापौर वैशाली बनकर, मोहनसिंग राजपाल, राजलक्ष्मी भोसले, शहर कार्याध्यक्ष सुनील बनकर, आठही विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष, सर्व सेलचे अध्यक्ष, कार्यकर्ते, नगरसेवक, माजी महापौर, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

 
Top