Add

Add

0
प्रशांत कोठाडिया यांचे मत; ‘एमएसीएस’ कॉलेजमध्ये स्वागत समारंभ
पुणे(प्रतिनिधी):- “शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्रांनी सृजनशीलतेकडे लक्ष दिले पाहिजे.तसेच,सामाजिक कार्या मध्ये सहभाग घेऊन आपल्यातील सामाजिक जाणीव विकसित केली, तर आपला सर्वांगाने व्यक्तीमत्त्व विकास होण्यास मदत होते,” असे मत बंगळुरु येथील अजिम प्रेमजी फौंडेशन आणि अजिम प्रेमजी विद्यापीठाचे सल्लागार प्रशांत कोठाडिया यांनी व्यक्त केले.
माईर्स आर्टस, कॉमर्स अ‍ॅण्ड सारन्स कॉलेजमध्ये (एमएसीएस) विविध अभ्यासक्रमांना नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभावेळी कोठाडिया बोलत होते. याप्रसंगी अ‍ॅटोस इंडियाचे मनुष्यबळ विभागाचे व्यवस्थापक उर्वीश पांडे, विश्‍वशांती संघाचे कार्यकारी संचालक डॉ. संजय उपाध्ये, एमएसीएसचे प्राचार्य डॉ. तानाजीराव मोरे, उपप्राचार्य डॉ. एस. एम. माळी, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. शुंभागी गारकवाड, संगणकशास्त्र विभाग समन्वयक प्रा. सचिन भोईटे आणि इंग्रजी विभागप्रमुख श्रीमती रजनी मोती आदी उपस्थित होते.
उर्विश पांडे म्हणाले, “विद्यार्थ्यानी ध्येय निश्‍चित करावे आणि ते मिळविन्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. त्याचप्रमाणे आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडावे. हाच यशस्वी होन्याचा मार्ग आहे. औद्योगिक क्षेत्रातील गरजा विद्यार्थ्यानी लक्षात घेवून कौशल्य आत्मसात करावेत.” 
विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार करण्यासह महाविद्यालरातील शिस्तीचे महत्त्व पटवून देताना डॉ. संजर उपाध्ये यांनी विद्यार्थ्यांची मने जिंकली. डॉ. तानाजीराव मोरे रांनी विद्यार्थी व पालकांचे स्वागत करत विद्यार्थ्रांनी सर्वांगीण विकासासाठी प्ररत्न केले पाहिजेत,असा कानमंत्र दिला.मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयां च्या शैक्षणिक वर्ष 2015-16 रा वर्षाचे संस्कृती नियतकालिकाचे प्रकाशन केले. 
प्रा. शुंभागी गारकवाड, प्रा. सचिन भोईटे आणि श्रीमती रजनी मोती रांनी आपआपल्या शाखेसंदर्भात विस्तारित माहिती दिली. तन्वी शुक्ला आणि अंजली सिन्हा या व्दितीय वर्ष कला शाखेच्या विद्यार्थीनींनी कार्यक्र माचे सूत्रसंचालन केले. डॉ. एस. एम. माळी रांनी आभार मानले.

Post a Comment

 
Top