Add

Add

0

पिंपरी (प्रतिनिधी):-भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कामगार आघाडीच्या वतीने भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कामगार मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस (प्रदेश सहसंयोजक) पदी चिंचवड शाहूनगर येथील केशव घोळवे  यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय केनेकर यांनी या निवडीबाबतचे पत्र दिले आहे.

केशव घोळवे हे थरमॅक्स कामगार संघटनेत उपा ध्यक्ष, सेक्रेटरी व अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. श्रमिक एकता महासंघामधे दहा वर्षापासून उपाध्यक्ष व सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. इंडस्ट्री ऑंल ग्लोबल युनियन जिनेव्हाच्या इंडिया कौन्सील कमि टीचे प्रतिनिधी. कामगार क्षेत्रात वेतन करार, कंपनी विलीनिकरण करार,उत्पादकता,आय.एल.ओ,कंपनी आर्थिक ताळेबंध,कामगार कायदे, कायझेन, टीपीएम, 5 एस, टीक्युएम, आरएफटी अश्या अनेक  संघटनानां मोफत सल्ला देऊन असंघटीत व संघटीत कामगारांचे जीवनमान सुधारण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
असंघटीत व संघटीत कामगारांची पुढील वाढती आव्हाने पूर्ण करण्यासाठी तसेच शासन, मालक, कामगार व ग्राहक यांचे संतुलन राखनेसाठी घोळवे यांची निवड करण्यात आली आहे.  त्यांच्या या निवडीमुळे परिसरातील सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

 
Top