Add

Add

0
पौड (प्रतिनिधी):- मुळशी तालुक्यातील  बार्पे येथील संतोष शिवराम कदम यांची मुळशी तालुका राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या सचिव पदी निवड करण्‍यात आली. जिल्‍हा बॅंकेचे संचालक आत्‍माराम कलाटे व 
राष्‍ट्रवादीचे तालुकाध्‍यक्ष सुनील चांदेरे यांच्‍या हस्‍ते निवडीचे पत्र देण्‍यात आले. राष्‍ट्रवादीचे जिल्‍हा परिषदेतील गटनेते शांताराम इंगवले, माजी सभापती रवींद्र कंधारे, जिल्‍हा सरचिटणीस शंकर मांडेकर, माजी जिल्‍हा परिषद सदस्‍य अनंता आखाडे, जेष्‍ठ नेते नंदकुमार वाळंज, मुळशी धरण विभाग अध्‍यक्ष विजय कानगुडे, तिस्‍करीचे माजी सरपंच अंकुश वाशिवले, सिध्‍दार्थ मोरे आदी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top