Add

Add

0

माले(प्रतिनिधी):- पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर युवा प्रतिष्‍ठाणच्‍यावतीने हिवाळीवस्‍ती-माले (ता.मुळशी) येथे अहिल्‍यादेवींची जयंती साजरी करण्‍यात आली. अहिल्‍यादेवींच्‍या प्रतिमेचे पुजन माजी सरपंच विजय दळवी यांच्‍या हस्‍ते झाले. यावेळी अहिल्‍यादेवींचा जीवनपट उलगडून सांगण्‍यात आला. दळवी, शिक्षक बाळु गोरे, बाळासाहेब आखाडे, प्रतिष्‍ठाणचे संस्‍थापक शिवाजी ढेबे, प्रदिप ढेबे, अंकुश गोरे यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. 'कार्यक्रमांच्‍या निमित्‍ताने वाडया-वस्‍त्‍यांवर विखुरलेल्‍या समाजाने एकत्र यावे. आरक्षण, विविध सोयी, सुविधा आदींचा पाठपुरावा करावा. समाजाचा विकास साधावा', असे आवाहन वक्‍त्‍यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते चिंतामण सातपुते, तानाजी दातीर, अनिल शेंडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जय मल्‍हार प्रतिष्‍ठानचे सुनील आखाडे यांनी; तर नियोजन पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर युवा प्रतिष्‍ठाणचे अध्‍यक्ष शिवाजी ढेबे, नागेश गोरे, निलेश ढेबे यांनी केले.

Post a Comment

 
Top