Add

Add

0
पंढरपूर (पंढरपूर ):-सोलापूर  जिल्ह्यासाठी आषाढी वारी ही अत्यंत महत्वाची आहे. या निमित्त येणा-या वार करी-भाविकांना जास्तीत-जास्त सुविधा देण्यासाठी नियोजन केले आहे. सर्व विभागांनी आपली जबाबदारी विशेष लक्ष देवून पार पाडावी असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (उपक्रमासह) परिवहन, कामगार वस्त्रोद्योग,पदुम खात्याचे राज्यमंत्री तथा  सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी केले.
           संत तुकाराम भवन (पंढरपूर) येथे आषाढीवारी पुर्वतयारीच्या आढावा बैठकीत पालकमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर  आमदार सर्वश्री  बबनदादा शिंदे, भारत भालके, हनुमंत डोळस, रामहरी रुपनवर, प्रशांत परिचारक, दत्तात्रय सावंत, जि.प.च्या अध्यक्षा श्रीमती जयमाला गायकवाड, नगराध्यक्षा साधना भोसले, जिल्हाधिकारी रणजित कुमार, जिल्हा पोलिस अधिक्षक एस.विरेश प्रभू, जि.प. प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रविण देवरे, आदी मान्यवर उपस्थित होते
            यावेळी बोलताना पालकमंत्री देशमुख म्हणाले की,  येणा-या  वारक-यांची- भाविकांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यांना सर्वांना जास्तीत-जास्त सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. आवश्यकतेनुसार वैद्यकीय व्यवस्था, गॅस-रॉकेलची उपलब्धता झाली पाहिजे. पिण्याचे स्वच्छ पाणी व स्वच्छते संदर्भात स्थानिक नागरीकांसह वारक-यांनी विशेष लक्ष द्यावे अशा सुचना  देवून,ते पुढे म्हणाले की, ही वारी निर्मल वारी व्हावी यासाठी वारक-यांनी प्रतिसाद द्यावा  असे आवाहन करुन, यात्रा कालावधी पुर्वी  पाच दिवस अगोदर नदी पात्रात  पाणी सोडण्यात येईल अशी माहिती  त्यांनी यावेळी दिली.
            जिल्हाधिकारी रणजित कुमार म्हणाले की, पंढरपुर आषाढी वारीचा भव्यदिव्य सोहळा असतो. याला अनन्यसाधारण महत्व आहे त्यामुळे प्रशासनानेही याला अनन्यसाधारण महत्व देवून ही यात्रा अधिक सुखकर, लोकाभिमुख करण्याचे नियोजन केले आहे. तसेच यामध्ये हयगय करणा-या विरुध्द राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत कारवाई करण्यात येईल. तर अप्पर जिल्हाधिकारी  प्रविण देवरे यांनी जिल्ह्यात माळशिरस तालुक्यात 7 तर पंढरपूर तालुका व  शहरात 6 ई.ओ.सी. सेंटर स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
            यात्रा कालावधीत वारक-यांना सुविधा देण्यासाठी मंदीर समितीने आर्थिक हातभार लावावा अशी अपेक्षा  आ.भारत भालके यांनी व्यक्त केली. आ.शिंदे म्हणाले की, ज्ञानेश्वर-तुकाराम महाराजांच्या पालख्या वगळता इतर गावांतून येणा-या पालख्यांना सुविधा देण्यासाठी त्या-त्या गावांना  निधी मिळावा.तर आ. परिचारक यांनी, प्रशासनातर्फे वारक-यांना रॉकेलचा पुरवठा वेळेवर व्हावा सुचना केली. आ.सावंत यांनी, पालखी मार्गावर कायम स्वरुपी शौचालय उभारण्यात यावीत अशी मागणी केली. नगराध्यक्षा भोसले यांनी आषाढी यात्रेपुर्वी शासनातर्फे देण्यात येणारे 5 कोटी रुपये मिळावेत अशी मागणी यावेळी  केली.

            यावेळी आ. रुपनवर, आ.डोळस तसेच जि.प.अध्यक्षा श्रीमती गायकवाड  यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी  विविध पालखी संस्थानचे प्रतिनिधी,  नागरीकांनी आषाढी यात्रेसंदर्भात आवश्यक त्या  सुचना केल्या.या आढावा बैठकीचे सुत्र संचालन प्रांतधिकारी संजय तेली तर आभार माळशिरसचे प्रांत दादासाहेब कांबळे यांनी मानले. यावेळी सर्व शासकीय अधिकारी, पोलिस विभागाचे अधिकारी विविध फडकरी, वारकरी संघटनेचे प्रमुख तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.   

Post a Comment

 
Top