Add

Add

0
माले(प्रतिनिधी):-मुळशी तालुक्यातील'घनगड'किल्‍ल्‍याच्‍या संवर्धना साठी पावसाळयापुर्वीची कामे पुर्ण करण्‍यात आली. शिवाजी ट्रेल, घनगड दुर्ग संवर्धन समिती या किल्‍ले संवर्धन क्षेत्रात काम करणा-या संस्‍थाच्‍या स्‍वयंसेवकांनी किल्‍ल्‍यावरील रंगकाम, दुरूस्‍ती, साफसफाई आदी कामे केली.
किल्ल्यावरील लोखंडी शिडी, रेलिंगला गंज लागला होता. तो गंज पॉलिशपेपरच्‍या मदतीने घासून काढण्‍यात आला. पुन्‍हा गंज चढु नये यासाठी ऑईल पेंटने रंग देण्‍यात आला.सौर दिवे,किल्‍ल्‍यावर उभार ण्‍यात आलेल्‍या झेंड्याचा स्तंभ यांची दुरुस्‍ती करण्‍यात आली.सुरक्षा दरवाजालाही रंग देण्‍यात आला.पायथ्‍याच्‍या गारजाई देवीच्‍या मंदिरा समोर किल्‍ल्‍याची माहिती देणा-या फलकाची दुरुस्‍ती करण्‍यात आली. 
काही ठिकाणी निसटलेले दगड पुन्‍हा बसविण्‍यात आले. गडावर जायच्‍या वाटा साफ करण्‍यात आल्‍या.पावसाचे अतिरिक्‍त, नको असलेले पाणी वाहून जाण्‍याची व्‍यवस्‍था केली.किल्ल्यावरील वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्‍य नियोजन करण्यात आले.त्‍यामुळे किल्ल्यावरील पाण्‍याच्‍या टाक्यांमध्ये मोठया प्रमाणात पाणी उपलब्‍ध आहे.यासाठी शिवाजी ट्रेलचे संस्‍थापक मिलिंद क्षिरसागर यांच्‍या मार्गदर्शनाखाली हिस्टरी क्लबच्या सुनीत क्षीरसागर, सुजीत नवले,प्रदीप जंगीड, शुभम वेदपाठक, गौरी जाधव, अनुश्री पाठक, आदित्य कदम आदी सभासदांनी योगदान दिले. नियोजन घनगड दुर्गसंवर्धन समितीचे भानुदास कदम यांनी केले.'किल्‍ल्‍यांचे आयुष्‍य वाढविण्‍यासाठी दरवर्षी पावसाळयापुर्वीची कामे करणे गरजेचे असते. लोखंडी वस्‍तुंना रंगकाम, किल्‍ल्‍याची किरकोळ डागडुजी केल्‍यानेही संवर्धनासाठी मोठी मदत होते. तसेच पर्यटकांनाही नीट, नेटका किल्‍ला पाहण्‍यास मिळतो. पाण्‍याचे नियोजन केल्‍याने मागील वर्षी कमी झालेला पाऊस व यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमध्‍ये देखील किल्ल्यावर टाक्‍यांमध्‍ये साठ टक्‍के पाणीसाठा शिल्लक आहे' असे क्षिरसागर यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top