Add

Add

0
                         जिल्हाधिकारी सौरभ राव यांना निवेदनाद्वारे मागणी
पुणे :-पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस ख्रिस्ती अल्पसंख्याक सेलच्या वतीने ख्रिश्‍चन दफनभूमीसाठी जागा मिळणेबाबत जिल्हाधिकारी सौरभ राव यांना निवेदन देण्यात आले. पुण्यातील 17 चर्चचा पाठिंबा असणारे आणि 700 सह्या असलेले निवेदन पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस ख्रिस्ती अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष नितीन डिसुझा यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांना निवेदन दिले. खडकवासला-वारजे ते कर्वेनगर या परिसरामध्ये दफनभूमीसाठी जागा मिळावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. 

चर्चचे प्रतिनिधीत्व करणारे चर्च ऑफ नॉर्थ इंडियाचे बिशप नरेश आंबाला, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस जैन सेलचे अध्यक्ष नीलेश शहा, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अशोक राठी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top