Add

Add

0

माले(प्रतिनिधी):-मुळशी धरण परिसरातील जिल्‍हा परिषद शाळांमध्‍ये प्रथम दिवसानिमित्‍तनवागतांचे मोठया उत्‍साहात स्‍वागत करण्‍यात आले. शाळेची गोडी लागण्‍यासाठी संभवे, माले, जामगाव, शेडाणी आदी गावांमध्‍ये गणवेश, शालेय साहित्‍य वाटप, विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्‍यांचे स्‍वागत झाले. संभवे येथे जिल्‍हा परिषद सदस्‍या शिल्‍पा ठोंबरे यांनी विद्यार्थ्‍यांचे गुलाब पुष्‍प देऊन स्‍वागत केले. मुलांची फेटे बांधून गावातून मिरवणूक काढण्‍यात आली. संभवेच्‍या सरपंच शालन जोरी, उपसरपंच शंकर जोरी, माजी सरपंच जयश्री मिरकुटे, माजी उपसरपंच अॅड.प्रशांत जोरी उपस्थित होते. मुख्‍याध्‍यापक संजीव बागुल यांनी नियोजन केले. रानडे यांनी शैक्षणिक साहित्‍य उपलब्‍ध करुन दिले.जामगाव येथे सजवलेल्‍या गाडीतून विद्यार्थ्‍यांची मिरवणूक काढण्‍यात आली. गणवेशांचे वाटप करण्‍यात आले. सरपंच हनुमंत सुर्वे, उपसरपंच विनोद ओव्‍हाळ, लक्ष्‍मण ठोंबरे, दत्‍तात्रेय सुर्वे, वसंत सुर्वे आदी उपस्थित होते.माले येथे माजी सरपंच विजय दळवी, खादी ग्रामोद्योगचे हनुमंत ठकोरे, गृहरक्षक दलाचे शंकर कारंडे आदींनी नवागतांचे स्‍वागत केले. तसेच शेडाणी येथे नवागत विद्यार्थ्‍यांना शाळेचे दप्‍तर, गणवेश, पुस्‍तकांचे वाटप करुन स्‍वागत केले. यावेळी उपसरपंच प्रकाश राऊत, शाळा व्‍यवस्‍थापन समितीचे राजेंद्र पडवळ, संजय हरगणे, वर्षा राऊत आदी उपस्थित होते.  

Post a Comment

 
Top