Add

Add

0
 चांदे येथील राम कृष्ण हरी सप्ताह समितीच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट व सिमेंट बंधाऱ्यासाठी आर्थिक मदत
पौड (प्रदीप पाटील):- मागील तीन वर्षांपासून सातत्याने कमी पडत असलेला पाऊस, त्यामुळे निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती व परिणामी रोजगाराच्या शोधातमराठवाड्यातील विविध गावातील तरुण शेतकऱ्यांचे रोजगाराच्या शोधात शहराकडेहोणारे स्थलांतर ही बाब लक्षात घेऊन पुणे येथील राष्ट्रीय सर्वांगीणग्रामविकास संस्थेने बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध गावातजलसंधारणाची कामे सुरु केली आहेत.या जलसंधारण कार्यास आर्थिक मदत करावीयाकरिता संस्थेने पुणे येथील रोटरी क्लब, सामाजिक संस्था, कंपन्या वव्यक्तिगत दाते यांना आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मुळशीतालुक्यातील चांदे गावचे सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र राज्य वारकरीमहामंडळाचे मुळशी तालुका अध्यक्ष जीवनमामा खानेकर यांनी पुढाकार घेऊनमुळशी तालुका राम कृष्ण हरी कीर्तन सप्ताह समितीच्या वतीने दरवर्षी घेतलाजाणाऱ्या यंदाच्या  कीर्तन महोत्सव सप्ताहाचा खर्च टाळून तो खर्चशेलगावच्या जलसंधारण कार्यासाठी करणार असल्याचे संस्थेला कळविले होते.
त्याप्रमाणे त्यांनी विविध ठिकाणी होणाऱ्या कीर्तन, प्रवचन व धार्मिककार्यक्रमातून लोकांना आवाहन करून जलसंधारण व शैक्षणिक कार्यासाठीस्वत:च्या प्रयत्नातून निधी उभा केला. त्यातून त्यांनी शेलगाव येथेप्रत्यक्ष जाऊन शेलगावसह अन्य पाच गावातील गरजू  विद्यार्थ्यांनाशैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे. तसेच गावातील शेतीला पाणी उपलब्धव्हावे याकरिता सुमारे ८ लाख रुपये खर्चाचा सिमेंट नाला बांधबांधण्यासाठी रोख स्वरुपात आर्थिक मदत शेलगाव येथे बंधारा उद्घाटनप्रसंगीसंस्थेकडे सुपूर्द केली . त्यांच्या या आर्थिक निधी संकलन कार्यात चांदेगावचे उपसरपंच व कॉंग्रेसचे युवा नेते प्रसाद खानेकर तसेच कॉंग्रेसपक्षाच्या मुळशी तालुका महिला कमिटीच्या उपाध्यक्षा भाग्यश्री देवकर,महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे संपर्क प्रमुख जालिंदर काळोखे यांनीआणि  देहू व आळंदी येथील अनेक वारकरी व मुळशीतील अनेक दात्यांनी मोलाचीमदत केली असल्याची माहिती जीवनमामा खानेकर यांनी शेलगाव येथील शालेयसाहित्य वाटप कार्यक्रमात दिली. यावेळी बोलताना खानेकर म्हणाले की,समाजातील कोणताही एक घटक दुखी असेल तर संपूर्ण समाजच दुखी राहतो.सर्वांच्या सुखाचा विचार हा संताचा मूळविचार असून त्या विचाराला अनुसरूनचमराठवाडयातील दुष्काळी परिस्थितीत किमान एका तरी गावात  दुष्काळनिवारणासाठी काहीतरी ठोस कार्य करावे या हेतूने उस्मानाबाद जिल्ह्यातीलपाण्याच्या बाबतीत टंचाईग्रस्त असलेले  शेलगाव हे दत्तक घेतलेआहे.याप्रसंगी जालिंदर काळोखे, वैराट महाराज , सोमनाथ साठे आदी उपस्थितहोते.

Post a Comment

 
Top