Add

Add

0
पुणे(जानव्ही चोले) :- दगडाच्या वापराच्या ‘स्टोन एज’पासून आजच्या ’टेक्नॉलॉजी एज’पर्यंत तंत्रज्ञानात झालेल्या आश्चर्यकारक बदलांची अनुभूती घेण्याची संधी पिंपरीचिंचवडकरांना उपलब्ध झाली आहे. मराठी विज्ञान परिषद आणि पिंपरी येथील सायन्स पार्कच्या वतीने ‘टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर असोसिएशन व मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाचे कार्याध्यक्ष प्रा. यशवंत घारपुरे यांचे ‘तंत्रज्ञानातील आश्चर्य’ या विषयावर शनिवार, दि. २ जुलै २०१६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता सायन्स पार्कच्या सभागृहात होणार आहे. हे व्याख्यान सर्वांसाठी खुले असून, विद्यार्थी व पालकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
एकविसावे शतक तंत्रज्ञानाने व्यापून टाकले आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांसह इतर सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तंत्रज्ञानाच्या आगमनाने आपल्या जगण्यात अद्भूत बदल झाले आहेत. आश्चर्यचकित करणार्‍या गोष्टी आपण पाहतो आहोत, या तंत्रज्ञानाची अद्भूतता नेमकी कशी आहे, याचे विश्लेषण प्रा. घारपुरे या व्याख्यानात करणार आहेत.

Post a Comment

 
Top