Add

Add

0
पुणे(प्रतिनिधी):-शेतकऱ्याच्या पीक कर्जाचे पुर्नगठन करण्याचा शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना कर्ज मिळाले पाहिजे यासाठी कर्ज वाटपाची गती वाढवावी अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या.
येथील शासकीय विश्रागृहात खरीप हंगाम 2015 मधील थकीत पीक कर्जाच्या पुर्नगठनाबाबत आयोजित आढावा बैठकी ते बोलत होते. यावेळी  आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन रमेश अप्पा थोरात, विभागीय सहनिबंधक संस्थेचे संतोष पाटील, जिल्हा

मध्यवर्ती बँकेचे कार्यकारी संचालक संजयकुमार भोसले, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आनंद कटके, जिल्हा अग्रणी बॅकेचे व्यवस्थापक डी.एम. देशमुख, सर्व तालुका सह.निबंधक, सर्व राष्ट्रीयकृत बँकेचे जिल्हा समन्वयक आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पालकमंत्री बापट म्हणाले की, पुर्नगठीत कर्जावरील प्रथम वर्षाचे 100 % संपूर्ण व्याज व त्यापुढील चार वर्षाचे 6% दराने होणारे व्याज शेतकऱ्याच्यावतीने राज्य शासन भरणार आहे. हा महत्वाकांक्षी कार्यक्रम जिल्हयात प्रभावीपणे राबविण्यात यावा. बँकांनी पाऊस पडल्यावर कर्ज वाटप करु, असा विचार करु नये.  त्वरीत लाभधारकांना कर्ज वाटप करावे अशा सूचना दिल्या.
 जिल्हयात खरीप 2015 मध्ये 50 टक्के पेक्षा कमी पैसेवारी असणाऱ्या 66 गावातील शेतकरी पुर्नगठणास पात्र आहेत. तसेच 1862 शेतकरी व सुमारे 11 कोटी 35 लाख पुर्नगठणाची रक्कम आहे. यानुसार जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत, सहकारी, ग्रामीण, खाजगी बँकामार्फत कर्ज वाटप केले जात आहे. यानुसार बँकनिहाय सविस्तर आढावा बैठकीत घेण्यात आला. जिल्हा मध्यवर्ती बँकेने 1363 कोटी रुपयाचे 76% उद्दिष्ट पूर्ण केले आहे. उर्वरित प्रकरणे बँकेने मंजूर करुन शाखेला पाठविण्यात आले असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
याप्रमाणे सर्व राष्ट्रीयकृत, सहकारी,खाजगी बँकेने त्वरीत कार्य करावे अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. तसेच उद्दिष्टपूर्तीसाठी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा पालकमंत्र्यांनी बैठकीत घेतला.
 तसेच 2015-16मध्ये पीक कर्ज वाटपाची माहितीही बैठकीत घेण्यात आली. यानुसार जिल्हयात मागील वर्षी 101% उद्दिष्ट पूर्ण केले असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
याप्रसंगी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सद्याचे पीक कर्जाचे काम समाधानकारक दिसत आहे. परंतू पावसाचे प्रमाण वाढल्यानंतर याची गती वाढली पाहिजे याबाबत सर्व बँकांचा  स्वतंत्र बैठकीत आढावा  घेणार असल्याचे सांगितले.
000000


Post a Comment

 
Top