Add

Add

0
पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी दींडीचा पालकमंत्र्यांच्याहस्ते शुभारंभ

पुणे (प्रतिनिधी):-'निसर्ग आणि पर्यावरणाचं नातं वैश्विक आहे. समृध्द पर्यावरणासाठी आणि मानवी मनावर चांगले संस्कार होण्यासाठी पर्यावरण रक्षणाचा संदेश वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांमार्फत राज्यभर पोहोचवावा, असे आवाहन पालकमंत्री  गिरीश बापट यांनी आज  केले.
     राज्याचा पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे 'पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी' उपक्रमाचा शुभरंभ पालकमंत्री बापट यांच्याहस्ते दिप प्रज्वलनाने करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर प्रशांत जगताप, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे, शाहिर देवानंद माळी, संगित नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या चंदाबाई तीवाडी, वनराईचे रविंद्र धारिया, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य पुंडलीक मिराशे, प्रादेशिक अधिकारी सुर्यकांत ढोके उपस्थित होते.
     यावेळी पालकमंत्री बापट म्हणाले की, प्रदुषणाची समस्या जगभर भेडसावत आहे. पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. समाजप्रबोधन आणि अध्यात्मिक प्रबोधनाव्दारे पर्यावरण संतुलित जीवनाचा संदेश राज्यातील लाखो वारकरी पंढरीच्या वारीत देत आहेत. पर्यावरण व वृक्षारोपणाद्वारे मानवी मनावर संस्कार होतो, त्यामुळे येत्या वनमहोत्सवात जास्तीत जास्त झाडे लावून ती जगवावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
     महापौर प्रशांत जगताप यांनी पर्यावणाचा संदेश वारीसोबत घेऊन जाणाऱ्या वाहनास फीत कापून मार्गस्थ केले. दिंडीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी टाळ मृदुगांच्या तालावर पर्यावरणास पूरक काव्य व ओव्या प्रस्तुत केल्या.
     महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य पुंडलीक मिराशे यांनी प्रास्ताविकामध्ये पुढील काळात वारी मार्गावर मोठया प्रमाणात वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे असे सांगितले.
     महाराष्ट्र लोककला मंचाद्वारे जाहिर करण्यात आलेला पर्यावरण मीत्र-2016 हा पुरस्कार वनराईचे रविंद्र धारिया यांना मिळाल्याबद्दल पालकमंत्री बापट यांच्याहस्ते सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
     यावेळी वनराईचे रविंद्र धारिया यांनीही मनोगत व्यक्त केले. पर्यावरण विभागाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे यांनी आभार मानले.

                             0000000

Post a Comment

 
Top