Add

Add

0
पौड(सचिन आकरे):-,पुणे येथील पार्क येथे नौकरीस असणा-या निशांत जयरतन ताक सांडे यांनी त्‍यांचा 29वा वाढदिवस क्विक हिल फाऊंडेशन कृत पौड दिशा केंद्रातील कातकरी मुलांसमवेत साजरा केला.दि.25/ 06 /2016 रोजीच्या त्‍यांच्‍या वाढदिवसा निमत्‍त शाळेत जाणा-या मुलांना पावसा पासून संरक्षणासाठी 20 छत्र्या व 28चप्‍पल वाटप केल्‍या.मुलांना गुळ शेंगदाण्‍याचा खाऊ देण्‍यात आला.निशांत ताकसांडे यांच्‍या मित्र मंडळीनी रंजित पिसे,महेश चोंदे,मिनांद तातवडे यांनी सहभाग घेतला.जिवन संवर्धन फाऊंडेशन संस्‍थेचे कार्यकर्ते सचिन आकरे उपस्थित होते.
    मुळशी तालुक्‍यात कातकरी समाजातील मुलांकरिता वनवासी कल्‍याण आश्रमाद्वारा माले(ता.मुळशी) येथे वस्‍तीगृह चालवले जाते.या वस्‍तीगृहात 5वी ते 10वी पर्यंतची मुले राहतात त्‍यांच्‍यासाठी निशांत जयरतन ताकसांडे यांनी 5000रु देणगी त्‍यांच्‍या वाढदिवसानिमित्‍त दिली तसेच माले वस्‍तीगृहाला भेट दिली. सचिन आकरे यांनी असे सुचवले की, निशांत जयरतन ताकसांडे यांच्‍या प्रमाणे इतर लोक देखील आपला वाढदिवस,लग्‍नाचा वाढदिवस पौड दिशा केंद्रातील विद्यार्थ्‍यांसमवेत साजरा करु शकतात- 1) वृक्षरोपन करणे 2) मुलांना शैक्षणिक साहित्‍य देणे 3) मुलांना खाऊ देणे 4)गणवेश वाटप करणे 5)ग्रंथालयासाठी पुस्‍तके देणे6) पोषण आहारासाठी किराणा साहित्‍य देणे.     
अधिक संपर्क : सचिन आकरे-8975660426

Post a Comment

 
Top