Add

Add

0
                 मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघास महासंचालकांची भेट... 


मुंबई(प्रतिनिधी):-माध्यमांचे क्षेत्र प्रचंड विस्तारले असून बदलत्या काळात माध्यमांच्या गरजाही बदलल्या आहेत. मुद्रित, इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच सोशल मीडियाद्वारे माध्यमांना माहिती देण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय सज्ज आहे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी आज येथे केले.
            श्री. ब्रिजेश सिंह यांनी नुकताच माहिती व जनसंपर्क महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यांनी आज मंत्रालयाच्या तळमजल्यावरील मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पत्रकार कक्षास भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष अरविंद भानुशालीउपाध्यक्ष प्रविण राऊत, कार्यवाह प्रमोद डोईफोडे, महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) देवेंद्र भुजबळ, संचालक (वृत्त व जनसंपर्क) शिवाजी मानकर, उपसंचालक (वृत्त) ज्ञानेश्वर इगवे आदी उपस्थित होते.
            संघाचे अध्यक्ष. उपाध्यक्ष तसेच सदस्यांनी पत्रकारांच्या विविध समस्या व अडचणी महासंचालकांसमोर मांडल्या. महासंचालनालयामार्फत या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करु असे श्री. सिंह यांनी सांगितले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आता ट्विटर, फेसबुक, यू-ट्यूब, व्हॉट्स ॲप या सोशल मीडियावर कार्यरत असून या माध्यमांद्वारे प्रसारित माहितीचा प्रसारमाध्यम प्रतिनिधींना दैनंदिन वृत्तांकनासाठी मोठा लाभ होईल, असा आशावादही श्री. सिंह यांनी यावेळी व्यक्त केला.

            मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष श्री. भानुशाली यांनी नुकतेच अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. त्याबद्दल श्री. सिंह यांनी श्री. भानुशाली यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन केले.  

Post a Comment

 
Top