Add

Add

0
पौड(सचिन आकरे ):-पुणे येथिल मैत्री फाऊंडेशन पुणे या संस्‍थेतील ६ जनांच्‍या ग्रुपने  मुळशी तालुक्यातील कळमशेत येथी आदिवासी वस्‍तीला भेट दिली व अंगणवाडीतील २० मुलांना नव्‍या गणवेशाचे वाटप केले.प्रत्‍येक मुलाला दोन गणवेश देण्‍यात आले. मैत्री फाऊंडेशन या संस्‍थेने कळमशेत गावातील अंगणवाडीची निवड केली. मैत्री फाऊंडेशनचे अलताब सर ३ते ६वयोगटातील लहान मुलांसाठी एक नवा अॅप लॅाच करणार आहेत. ते अॅप फक्‍त इंगिलश मध्‍येच असणार आहे.
 कळमशेत या अंगणवाडीत बहुतांश मुले ही कातकरी समाजाचे आहेत, गणवेश दिल्‍यावर त्‍यांच्‍या चेह-यावरील हास्‍य हे मनाला भारुन जात होते. या मुलांना शिक्षणाची गोडी लागत आहे.

    मुलांना पाहुण्‍यांच्‍या हस्‍ते दोन गणवेश,तसेच लाडु चे वाटप करण्‍यात आले. यावेळी, कळमशेत अंगणवाडीच्‍या शिक्षिका सौ.सोनवणे मॅडम व जीवन संवर्धन फाऊंडेशन चे कार्यकर्ते सचिन आकरे हेही उपस्थित होते. 

Post a Comment

 
Top