Add

Add

0
परिक्षार्थींनी केंद्रावर वेळेवर पोहोचण्याची दक्षता घ्यावी

पुणे(प्रतिनिधी):- महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचेमार्फत राज्यसेवा (मुख्य) परिक्षा 24 ते 26 सप्टेंबर,2016 रोजी आयोजित करण्यात ली आहे. नागनाथ मारुती गडसिंग गुरुजी ज्युनि  कॉलेज, कृष्णनगर, चिंचवड, पुणे-19 आणि मुलींचे आगरकर हायस्कुल, 442,सोमवार पेठ,पुणे-11 या शाळांमध्ये उपरोक्त परिक्षा घेण्यात येणार आहे

25 सप्टेंबर, 2016 (रविवार) रोजी मराठा  समाजाच्यावतीने शहरात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहेया मोर्चामध्ये मोठया प्रमाणावर नागरीक सहभागी होणार असल्यामुळे शहरातील वाहतुक व्यवस्थेमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 25 सप्टेंबर, 2016 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत राज्यसेवा (मुख्य) परिक्षेच्या परिक्षार्थींनी परिक्षा केंद्रावर परिक्षेच्या नियोजित वेळेपूर्वी साधारण  एक तास अगोदर पोहचावे. वाहतूक खोळंबल्यामुळे परिक्षार्थीना परिक्षेस मुकावे लागु नये यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी तथा परिक्षा नियंत्रक राजेंद्र मुठे यांनी सर्व परिक्षार्थीना प्रसिध्दीपत्रकाद्वारे आवाहन केलेआहे

Post a Comment

 
Top