Add

Add

0
महाराष्ट्रात सध्या भेडसावत असलेली सर्वात भीषण समस्या म्हणजे दुष्काळ. आपल्याकडे शेतकऱयांना आत्महत्या केल्यावर पैसे मिळतात. पण, जिवंतपणी पैशाअभावी जीव देण्याची पाळी येते. नेमक्या याच प्रश्नावर भाष्य करणाऱया ‘निवडुंग’ या चित्रपटाची निर्मिती मीना शमीम फिल्म्स या बॅनरअंतर्गत होत आहे. निर्माते मुनावर शमीम भगत यांची ‘निवडुंग’ ही पहिलीच मराठी निर्मिती असून स्वत: मुनावर भगत या सिनेमाचे दिग्दर्शन करीत आहेत. यापूर्वी हिंदी चित्रपटसफष्टीत काही यशस्वी निर्मितीनंतर मुनावर भगत आता मराठीकडे वळले आहेत. सामाजिक आशय असलेल्या या चित्रपटात एका वेगळय़ा प्रकारची प्रेमकथाही पहायला मिळेल.
  ‘निवडुंग’ या चित्रपटाच्या चित्रिकरणाचे पहिले शेडय़ूल नुकतेच शिर्डी आणि परिसरात पार पडले. सध्या या चित्रपटाचे चित्रिकरण दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव येथे सुरू असून या चित्रपटातील लावणी गीत नुकतेच अभिनेत्री संस्कृती बागुडेवर चित्रित करण्यात आले. ‘माझ्या ज्वानीला अंगभर भिजवा की…’ही लाव णी गीतकार झहीर कलाम यांच्या लेखणीतून आकाराला आली असून, उर्मिला धनगरच्या सुमधुर आवाजात संगीतकार रफिक शेख यांनी ही लावणी संगीतबद्ध केली आहे. मेघा सपंत यांनी या गाण्यासाठी नफत्यदिग्दर्शन केले आहे. ‘निवडुंग’ मधील या लावणीच्या चित्रिकरणादरम्यान बोलताना संस्कृती म्हणाली, ‘लावणी हा नृत्यं
प्रकार मला खूप आवडतो. पण, या चित्रपटातील ही लावणी कथेमध्येही महत्त्वाची भूमिका बजावते आहे. या चित्रपटाचा विषय सामाजिक आशयावर आधारित असून, तो मांडण्यात या लावणीचा मोलाचा वाटा आहे. उर्मिला धनगरच्या आवाजाने या लावणीला उचित न्याय दिला आहे. गीतकार झहीर कलाम यांनी अचूक शब्दांची पेरणी करून या लावणीचे सौंदर्य अधिक खुलवले आहे. मेघा संपत यांच्या नफत्यदिग्दर्शना खाली या लावणीवर परफॉर्म करताना एक नवीन अनुभव आलाच.पुन्हा काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचे समाधानही लाभले. मुनावर भगत यांच्यामुळे पुन्हा एकदा भूषणसोबत काम करण्याचा योग जुळून आला. प्रेक्षकांनाही आमची जोडी नक्कीच आवडेल.

  चित्रपटाचे दिग्दर्शन मुनावर भगत यांनी यावेळी बोलताना सांगितले, ‘महाराष्ट्रावर सध्या दुष्काळाचे सावट असून, या चित्रपटातही हाच विषय हाताळण्यात आला आहे. या चित्रपटातील ही लावणी केवळ मनोरंजनासाठी नसून त्याद्वारे काहीतरी सांगण्याचा लेखकाचा उद्देश आहे. संस्कृतीने या ठसकेबाज लावणीवर अप्रतिम नफत्य केले आहे. गीतलेखनापासून नफत्यदिग्दर्शनापर्यंत सर्वच बाबतीत या लावणीवर खूप मेहनत घेण्यात आली असून प्रेक्षकांनासुद्धा नक्कीच आवडेल.’ या चित्रपटात केशव नावाची व्यक्तिरेखा साकारणाऱया भूषण प्रधानने यावेळी बोलताना सांगितले, संस्कृती एक चांगली अभिनेत्री आहेच. पण, याचबरोबर ती सुरेख नफत्यांगनाही आहे. संस्कृतीने आपल्या बहारदार नफत्याने या लावणीमध्ये सुंदर रंग भरले आहेत. मुनावर भगत यांचा जरी हा पहिलाच मराठी चित्रपट असला तरी त्यांनी हिंदीत बरेच काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना खूप काही शिकण्याची संधी मिळाली. भूषण प्रधान आणि संस्कृती बालगुडे या चित्रपटात प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार असून सारा श्रवण, अस्ताद काळे, प्राजक्ता दिघे, शेखर फडके यांच्याही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा मुनावर भगत यांनी लिहिली असून, महेंद्र पाटील यांनी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत.

Post a Comment

 
Top