Add

Add

0
पुणे (प्रतिनिधी):-' लक्ष्य-2017डोळ्यापुढे ठेवून कामाला लागा , स्वतःला झोकून देऊन काम करा. नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण होईल असे काम करा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वांचा पक्ष आहे .असे उद्गगार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज गंजपेठेतील सावित्रीबाई फुले सभागृहात 'लक्ष्य 2017' या प्रशिक्षण शिबिरातील  दुसऱ्या सत्रात बोलताना काढले.  
ते पुढे म्हणाले , निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'हजारी कार्यकर्ता' हि पद्धत अवलंबली पाहिजे .  निवडणूक तोंडावर आल्या कि, आश्वासाने  द्यायाची, स्वप्ने दाखवायची आणि नागरिकांची दिशाभूल करायाची हे भारतीय जनता पक्षाचे तंत्र आहे. गेल्या पाच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोणती कामे केली आहेत हे  नगरसेवक,  कार्यकर्ते यांनी आपण केलेल्या विकास कामातून नागरिकांना दाखवून दिले पाहिजे . 
      भारतीय जनता पक्षाच्या राज्यात ना कामगार, ना शेतकरी, ना उद्योगपती , ना गरीब जनता सुखी नाही. त्यांच्या जगण्याशी या सरकारला देणे घेणे नाही हे दुर्दैव आहे . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा   भारतीय जनता पक्ष पुढे नेट आहे . कोणत्या दिशेने ते देशाला घेऊन जात आहेत हि गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. सर्वधर्म समभाव ही आपल्या देशाची ओळख आहे . सर्व धर्म समभाव  हा एकता आणि अखंडतेचा कणा आहे . दुर्दैवाने हा कणा कमकुवत करण्याचे काम राज्यात आणि देशात चालू आहे अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना केली . 
निलेश निकम  यांनी गेल्या 10वर्षात  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुणे महानगर पालिकेच्या माध्यमातून केलेल्या कामांची व अनेक योजनांची माहिती दिली . यावेळी कसाब विधानसभा मतदार संघ अध्यक्ष सुरेश बांदल , तसेच किरण कद्रे , गणेश नलावडे आदी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते , नगरसेवक मोठ्या संख्येयेने उपस्थित होते. 
प्रशिक्षण शिबिरात उपस्थितांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित सत्रात मकरंद टिल्लू यांनी मार्गदर्शन केले . 'माणसांना जोडणे, त्यांच्याशी संवाद साधणे खूप महत्वाचे आहे. खुप ताकतीने, आत्मविश्वासाने काम करा. हसत हसत सर्वाना सामोरे जा. आपले 'लक्ष -2017 आहे त्यासाठी तयार राहा . 

Post a Comment

 
Top