Add

Add

0

                                    आंबवणे शाळेस संगणक भेट...

माले (प्रतिनिधी):- 'संगणक शिक्षण ही काळाची गरज आहे. यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी कमी पडत आहे. मुळशी तालुक्यात आयटी पार्क असूनही तेथील नोकऱ्यांमध्ये मुळशीकरांना स्थान नाही.त्यामुळे येणाऱ्या काळात आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी मुलांना पहिलीपासूनच संगणकाचे शिक्षण देणे गरजेचे आहे', असे मत बारामती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे अध्यक्ष अमित कंधारे यांनी व्यक्त केले.
मुळशी तालुक्यातील आंबवणे येथील कै सोनु अनाजी वाळंज विद्यालयास कंधारे संस्थापक अध्यक्ष असलेल्या अजित कला क्रीडा व सांस्कृतीक प्रतिष्ठानच्या वतीने कम्पुटर भेट देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी विद्यालयाचे संचालक मिलिंद वाळंज, मुळशी तालुका सेवा दलाचे अध्यक्ष अंकुश तोंडे, राष्ट्रवादी युवकच्या आंबवणे गणाचे अध्यक्ष नामदेव हिरवे, उपाध्यक्ष राम मोहणे, कोंढावळ्याचे माजी उपसरपंच संतोष कंधारे, विद्यालयाचे मुख्याध्यापक बटु देवरे, सागर वाळंज, गणेश श्री दळवी, नवनाथ दळवी, सचिन चव्हाण, सुनिल वाळंज, अजय कालेकर, राजु तोड़े, विनायक तोड़े, प्रविण माताळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top