Add

Add

0

पौड(प्रतिनिधी):- विद्यालयीन आणि महाविद्यालयीन तरूणींना होत असलेल्या छेडछाडीच्या घटनागंभीर असून त्यावर लक्ष्य ठेवण्यासाठी पौड पोलिस स्टेशनच्या वतीने निर्भया पथकसुरू करण्यात आले आहे.आपली काही तक्रार असल्यास तात्काळ या पथकाकडे नोंदवावी.कोणत्याही विद्यार्थीनीला कोठेही रस्त्यावर  ञास झाल्यास त्यांनी पोलिसस्टेशनला तात्काळ संपर्क साधावा.अशा माथेफिरूवर ताबडतोब कारवाई करण्यात येईल. आप्पासाहेब ढमाले माध्यमिक विद्यालय खेचरे येथील दहावीच्या १९९८ च्या बँचच्याविद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधत विद्यालयात असलेल्या सर्वशिक्षकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी विश्वभंर गोल्डे बोलत होते.यावेळी माजीआमदार शरद ढमाले, भाजपा तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र बांदल, जिल्हा परिषदेचेमाजी अध्यक्ष आबासाहेब ढमाले,भाजपा तालुका अध्यक्ष अशोक साठे,जिल्हा उपाध्यक्षदत्ताञय सुर्वे,तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब कुरपे, अनंता चौधरी,दिपकसाठे,नवनाथ पारखी, मुख्यध्यापक अंकुश बोराडे, शिक्षक सुंबे,भोसले,मुलाणी,प्रक्षाळे,जाधव, पळसकर,भोईटे,जोरी,ओव्हाळ  उपस्थित होते.या वेळी राजेंद्र बांदल यांनी सांगितले की, मुळशी तालुक्यातील माध्यमिकविद्यालयामध्ये असलेल्या शाळांमधील अडचणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनसोडविण्यात येतील.या कार्यक्रमाचे आयोजन पप्पूशेठ कंधारे यांनी केले होते.तर अशोक जोरी,सखारामपवार, जितेंद्र ढमाले, अर्जून तोंडे, दुर्वेश धुमाळ, रविंद्र दारवडकर, दिपकधुमाळ, संजय शेडगे हे १९९८ च्या बँचचे विद्यार्थी उपस्थित होते.आभार राजूशिळीमकर यांनी मानले.फोटोओळ: आप्पासाहेब ढमाले विद्यालय खेचरे ( ता.मुळशी )  येथे शिक्षकदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात  बोलताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वभंर गोल्डे.

Post a Comment

 
Top