Add

Add

0
माले(प्रतिनिधी):- 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधेपणाने राहुन, देशसेवेचं व्रत घेतलं आहे. त्‍यानुसार त्‍यांचाच आदर्श ठेवून कार्यकर्त्‍यांनीही आपले आनंदाचे क्षण वंचित, गरजुंना मदत करून साजरे करावेत', असे आवाहन पुणे कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीचे संचालक गोरख दगडे यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या वाढदिवसा निमित्‍त प-लेक्‍स, जाहिरात बाजीला फाटा देत भारतीय जनता पक्षा च्‍या कार्यकर्त्‍यांनी मुळशी तालुक्यातील माले  येथील वनवासी कल्‍याण आश्रमातील आदिवासी विद्यार्थ्‍यांना फळे, वहया, शालेय साहित्‍य, कपडे, साबण, तेल, वहया आदींचे वाटप केले यावेळी दगडे बोलत होते. पुणे जिल्‍हा सरचिटणीस अॅड.सचिन सदावर्ते, माजी जिल्‍हा सरचिटणीस शरद  भोते,सहकार आघाडी सरचिटणीस विलास चोंधे, तालुका सरचिटणीस आप्‍पासाहेब चोंधे, उपाध्‍यक्ष राजाभाऊ वाघ, युवा मोर्चा उपाध्‍यक्ष किरण देव, व्‍यापार आघाडीचे अध्‍यक्ष उत्‍तमचंद अगरवाल, अमर कोकाटे, जितेश शेलार आदी उपस्थित होते. 
यावेळी भाजपा कार्यकर्त्‍यांनी वसतीगृहाच्‍या कामकाजाची माहिती घेतली. विद्यार्थ्‍यांशी संवाद साधून त्‍यांच्‍या गरजा जाणुन घेतल्‍या. व वसतीगृहाला विविध प्रकारची मदत मिळवून देण्‍याचे आश्‍वासन दिले.

-----

Post a Comment

 
Top