Add

Add

0
पुणे (प्रतिनिधी):-भा.ज.पा. पुणेचे अध्यक्ष योगेश गोगावले यांनी म.न.पा. निवडणुकीचे निमित्ताने पत्रकबाजी सुरु केली आहे.पुणे शहरात राष्ट्रवादीने जी नागरी सुधारणेची विधायक कामे केली ती सर्व पुणेकर जनता जाणते, परंतु पुणेकरात गैरसमज पसरविण्यासाठी गोगावालेनी राष्ट्रवादीचे नेते व पक्षावर आग पाखाडताना सवंग विधाने करून जनतेची दिशाभूल चालवली आहे.
महानगरपालिकेत भा.ज.पा.विरोधात असताना एकही विधा यक सुधारणे कामी राष्ट्रवादी व कॉंग्रेसला साथ दिली नाही हे जगजाहीर आहे. खुद्द त्यांच्याच पक्षात ते सदैव बहिकृत व वाळीत असलेले व्यक्तिमत्व होते व आहेत. त्यांचा स्वतःचा पुण्याच्या जडणघडणीत काहीही वाटा नाही.
पुणेकरांच्या प्रश्नाची जाण नसलेले भाजपचे अध्यक्ष खोटा रडा प्रचार करीत आहेत. ज्यांनी सातत्याने पक्षबदल करून स्वतःचाच स्वार्थ साधला आहे त्यांनी स्वतः च्या पक्षबांधणी कडे लक्ष द्यावे. इतरांवर चिखलफेक करू नये. पुणेशहरच नव्हे तर शेजारील पिंपरी चिंचवड मधील विकास हा अजित पवारांच्या यांच्याच नेतृत्वाखाली झालेला आहे. पुणे शहर तर देशपातळीवरील स्मार्ट सिटी स्पर्धेत दुसर्या क्रमांकावर आलेले आहे, हीच राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या कामाची पावती आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपापली भूमिका मांडत असतो, एकमेकांमध्ये स्पर्धा देखील असणारच. शहरातील एका जबाबदार राजकीय पक्षाच्या अध्यक्षाने धादांत खोटी व हीन पातळीवरील टीका करू नये. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहराला अशी भाषा अशोभनीय आहे.

Post a Comment

 
Top