Add

Add

0
पुणे (प्रतिनिधी):- धर्माच्या नावावर विघटन करण्याचे काम , छुपा अजेन्डा राबविण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत आहे. अचछे दिन चे गाजर नागरिकांना दाखवून त्यांना दिवसाढवळ्या स्वप्न दाखविली, आणि त्यांची फसवणूक केली आहे हे जनतेला आपल्याला दाखवून द्यायचे आहे, 'असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज निसर्ग मंगल कार्यालय येथे झालेल्या आढावा बैठकीत काढले. 
         ते पुढे म्हणाले, 'पुण्यात पायाभूत सुविधा खूप झाल्या पण मार्केटिंग किती झाल, हे पहिले पाहिजे मार्केटिंग करण्यात आपण कमी पडतो, पुणेकरांसमोर  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेली कामे आहेत ती त्यांच्यापर्यंत पोहचली पाहिजेत. भारतीय जनता पक्ष नगरसेवकांना धमकी ,आमिष , प्रलोभने दाखवून सत्ता मिळविण्याच्या प्रयत्नात आहे.परंतु सर्वानी एकसंघ होऊन कामा ला लागूया. 
  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  प्रथम काश्मीर मध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. 
  मेळाव्यादरम्यान मार्गदर्शन करताना  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीत भारतीय जनता पक्षाचा खरपूस समाचार घेतला. 
   सुरवातीलाच त्यांनी माझा सत्कार नको बहुमत मिळवून द्या, असे सांगितले , पुण्यात दोन वेळा सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून आपण निवडून आलो होतो. गेली पाच वर्ष बहुमत नसताना देखील पुणेकरांसाठी काम करत राहिलो. ते त्यांच्यापर्यंत पोहचावा. आपला पक्ष एक कुटुंब आहे त्याप्रमाणे कमला लागा. 
 भारतीय जनता पक्षाच्या राज्यात ना कामगार, ना शेतकरी, ना उद्योगपती , ना गरीब जनता सुखी नाही. कधी कांद्याच्या भाववाढीमुळे लोकांच्या डोळ्यात पाणी येत, तर कांद्याला कमी भाव मिळाला तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत, पण या निवडणुकीत आपण भारतीय जनता पक्षाच्या डोळ्यात पाणी आणू , असे बोलल्यावर सभागृहात हशा पिकाला. 
        यावेळी खासदार ,शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांनी प्रास्ताविक केले . त्यांनी प्रभाग रचना आणि बूथ लेव्हल एजन्ट याविषयी माहिती दिली. 
       राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  अल्पसंख्यांक  सेल अध्यक्ष इकबाल शेख, युवती  सेल अध्यक्ष मनाली भिलारे, युवक सेल अध्यक्ष राकेश कामठे,  महिला आघाडी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. आढावा बैठकीला प्रचंड मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपथित होते. प्रवक्ते  अंकुश काकडे,आमदार अनिल भोसले ,आमदार  ऍड. जयदेव गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन अशोक राठी यांनी केले. नितीन जाधव यांनी आभार मानले. 
  ................................................................

Post a Comment

 
Top