Add

Add

0
माले (प्रतिनिधी):-पुणे-कोलाड रस्‍त्‍यावर मुळशी तालुक्यातील माले येथील  घाटात ब्रेक फेल झाल्‍याने मालवाहु कंटेनरला अपघात झाला. गुरुवार (ता.15) पहाटेच्‍या सुमारास झालेल्‍या या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.
गुरुवारी पहाटेच्‍या सुमारास मालवाहु कंटेनर ( एम.एच.12, के.पी.4693) कोकणातून पुण्‍याच्‍या दिशेने निघाला होता. माले घाटातील तीव्र उताराच्‍या घाटरस्‍त्‍यावर आल्‍यावर गाडीत असलेल्‍या जड माल व तीव्र उतारामुळे कंटेनरचे ब्रेक फेल झाले.त्‍यामुळे कंटेनर घाटातील मातीच्‍या धशीला जाऊन धडकला. या अपघातात कंटेनरच्‍या केबीनचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.अशी माहिती ग्रामस्‍थांनी दिली.
''माले घाटरस्‍ता तीव्र उताराचा असल्‍याने वारंवार अपघात होत असतात.येथे अपघात टाळण्‍यासाठी कायम स्‍वरुपी उपाययोजना कराव्‍या.''अशी मागणी युवासेनेचे भोर विधानसभा कार्याध्‍यक्ष अविनाश कानगुडे यांनी केली.

Post a Comment

 
Top