Add

Add

0

                या विषयावर प्रवचन आणि क्रांतिकारकांचे चित्रप्रदर्शन !


कोथरूड(प्रतिनिधी):-''लोकमान्य टिळकांनी समाजाच्या संघटनासाठी चालू केलेल्यासार्वजनिक गणेशोत्स वाला सध्या सामाजिक आणि काही प्रमाणात विकृत स्वरूपप्राप्त झाले आहे. गणेशोत्सव सार्वजनिक करण्या मागील लोकमान्य टिळकांचामूळ उद्देश लोकांना समजावा आणि त्यातून समाजप्रबोधन व्हावे यासाठी कोथरूड डेपो येथील शिवतारा गणेश उत्सव मंडळ येथे 9 सप्टेंबर या दिवशी ‘आदर्शगणेशोत्सव कसा साजरा करावा?’ या विषयावर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील 40 जणांनी प्रवचनाचा लाभ घेतला. न्यासा च्या सौ. नीता साळुंखे यांनी प्रवचन घेतले. मंडळाच्या अध्यक्षा सौ.अलका भट यांचेउपक्रमासाठी सहकार्य लाभले.
       'सनातन संस्था कोल्हापूर' न्यासाने व्यक्तीच्या पारमार्थिकउन्नतीसह समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षालादेखील प्राधान्य दिलेआहे. 'सनातन संस्था कोल्हापूर' न्यासाच्या अंतर्गत नियमितपणे समाजसाहाय्यआणि अध्यात्मप्रसार या उद्देशाने विविध उपक्रम राबवण्यात येतात. योगशिबिरे, जनजागृतीपर व्याख्याने, फळे वाटप, वह्या वाटप, विनामूल्य आरोग्यतपासणी आणि औषधे वाटप शिबिरे, मंदिर स्वच्छता, तणावमुक्ती व व्यसनमुक्तीयांसाठी प्रबोधन करणे, विविध ठिकाणी गरजूंना अन्नदान, कपडे वाटप असेकार्यक्रम आयोजित केले जातात. याचाच एक भाग म्हणून सदर उपक्रम घेण्यातआला.
       'सनातन संस्था कोल्हापूर' न्यासाच्या उपक्रमांच्या अंतर्गतसमाजाला क्रांतिकारकांच्या देशकार्याची संपूर्ण माहिती मिळूनक्रांतीकाराकांसारखे राष्ट्रप्रेम निर्माण व्हावे या उद्देशानेक्रांतिकारकांचा गौरवशाली इतिहास स्पष्ट करणाऱ्या फलकांचे प्रदर्शनलावण्यात आले. डी.पी. रस्त्यावरील वृंदावन गणेश मित्र मंडळ येथे 8सप्टेंबरला; तर सिंहगड रस्त्यावरील वडगावममध्ये सोना विहार येथे 14नोव्हेंबर या दिवशी क्रांतीकारांचे चित्रप्रदर्शन लावण्यात आले होते.
वृंदावन गणेश मित्र मंडळाचे उपाध्यक्ष श्री.अभिषेक नाणेकर यांचे कोथरूडयेथील उपक्रमासाठी सहकार्य लाभले. यावेळी कोथरूड परिसरातील 50 आणि सोनाविहारमधील 150 जणांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. कोथरूड येथे न्यासाच्यासौ. गीता देशपांडे, सौ. पुरंदरे; तर वडगाव येथे सौ.सुनिता शिंदे, सौ.अनिता रानवडे यांचा प्रदर्शनाच्या आयोजनात सक्रीय सहभाग होता.

Post a Comment

 
Top