Add

Add

0
माले (प्रतिनिधी):-पुणे-कोलाड रस्‍त्‍यावर मुळशी तालुक्यातील ढोकळवाडी  येथे वाळु वाहतुक करणारा ट्रक (एम.एच.12,एच.डी.-5808)रस्‍त्‍याच्‍या कडेला पलटलेल्‍या अवस्‍थेत आढळून आला.शुक्रवार दि.23 रोजी  मध्‍य रात्रीनंतर हा अपघात झाला.कोकणातून पुणे जिल्‍हयात मोठया प्रमाणात वाळु वाहतुक होत असते. अनेकवेळा ही वाहतुक रात्रीच्‍या वेळीही होते. त्‍याप्रमाणे कोकणबाजूने ट्रक पुण्‍याच्‍या दिशेने जात होता.ढोकळवाडी गावाच्‍या पुढे काही अंतरावर रस्‍त्‍याच्‍या कडेने जाताना ट्रक कलंडून पलटला. शनिवारी सकाळी हा प्रकार ग्रामस्‍थांच्‍या लक्षात आला. याठिकाणी रस्‍त्‍याच्‍या कडेला 
रस्‍ता खचल्‍याच्‍या खुणा आहेत. रस्‍त्‍याच्‍या कडेने जाताना ट्रकमधील वाळुच्‍या वजनाने रस्‍ता खचुन ट्रक पलटी झाला असावा, असे ग्रामस्‍थांनी सांगितले. या अपघाताची नोंद पोलिसांत नसल्‍याने अपघातात कोणी जखमी झाले किंवा नाही, तसेच अपघाताचे कारण समजु शकले नाही.

Post a Comment

 
Top