Add

Add

0

पुणे (जान्हवी चोले ):-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ची सुरुवात केल्यापासून अनेक प्रयत्न केले गेले आहेत. असाच अत्यंत विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध हाती घेतलेला ‘लेट्स
​ 
चेंज-2016
’ हा तीलचएक व्यापक प्रकल्प! निष्काळजीपणे कचरा भिरकावणे, थुंकणे याला पायबंद घालण्याचा सर्वंकष प्रयत्न या प्रकल्पा तून होत आहे. शाळांसाठी साप्ताहिक ‘तासिका’ या उपक्रमामध्ये-154/15 या सरकारी अध्यादेशान्वये ‘लेट्स चेंज’ प्रकल्पाला मान्यता दिली आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातील शाळांत -2016-2017 या शैक्षणिक वर्षात राबविला जाणार आहे.
या प्रकल्पाविषयी लेट्सचेंजचे प्रकल्प संचालक रोहित आर्या म्हणाले, "या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व शाळांमध्ये 'लेट्स
​ ​
चेंज' हा चित्रपट दाखवला जाणार आहे. विद्यार्थ्यांना रंजकतेसह ठोस कृतीसाठी प्रोत्साहित होतील. त्या पाठोपाठ होणाऱ्या चर्चा, घटनीय अनुभवांचा आदान-प्रदान, स्पर्धा आणि वेगवेगळ्या ठिकाणी होणारे बक्षीस समारंभ यामुळे जानेवारी 2017 पर्यंत संपूर्ण काळात या उपक्रमाबद्दलचा उत्साह टिकून राहील, असा विश्वास आहे. शाळांवर विशिष्ट वेळाचे बंधन व बोजा न टाकण्याचाच दृष्टीने आखण्यात आलेला हा लेट्स
​ ​
चेंज प्रकल्प सगळ्यांना रंजक आणि उत्साहपूर्ण वाटल्यानेच अतिशय प्रभावी ठरेल व त्याचे दृश्य परिणाम लगेच दिसतील."

स्वच्छ भारत मिशनच्या समितीचे अध्यक्ष पद्मभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांनीही हा उपक्रम साधा, रंजक, अतिशय मूलभूत आणि तरीही, किंबहुना म्हणूनच प्रभावी ठरेल, असे मत व्यक्त केले आहे.‘ही एक उत्तम कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी तसेच जाहिरातीची संधी ठरू शकते ,असे सांगत त्यांनी ‘उद्योग जगताने शाळांना पुरस्कृत करावे’ असे आवाहनही केले आहे.
जेष्ठ अभिनेते रमेश देव म्हणाले की, ‘हा उपक्रम चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेमध्ये पोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामधून शालेय स्तरावरच मुलांमध्ये चांगल्या नागरी सवयी रुजतील त्याचा आम्हाला विश्वास आहे. पहिल्या टप्प्यात विद्यार्थी ‘सरदार पटेलबाझी’ करत रस्त्यावर इतरत्र कचरा टाकणाऱ्यांना रोखतील. ‘सरदार पटेलबाझी’ हा ‘गांधीगिरी’ पेक्षा अतिशय जहाल असे पवित्रा आहे. आमच्या उपक्रमात एकूण 4 टप्पे आहेत,आणि प्रत्येक टप्पा एका अतिशय करमणूकप्रधान असे चित्रपटाच्या माध्यमातून उलगडून ‘स्वच्छ भारत मिशन’ चा  यशासाठी मोठा हातभार देईल.’
रोहित आर्या पुढे म्हणाले की, या प्रकल्पाचा खर्च भागवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून एक माफक शुल्क आकारण्यास महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली असली, तरी एबीसीडीई फौंडेशनच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यामागे शुल्क न ठेवता, प्रत्येक शाळेमागे माफक शुल्क आकारण्याचे प्रयत्न करीत आहोत. प्रत्येक विद्यार्थ्याकडून किती शुल्क घायचे हा निर्णय शाळेवर सोपवण्यात येईल.जर पैसे जमवले तर दाखवलेल्या चित्रपटाचे सूत्र पकडून सुचवण्यात आलेला उपक्रमावर ते शाळेतर्फे खर्च केले जातील. या प्रकल्पाअंतर्गत सर्वोत्तम शिक्षण अधिकारी, गटशिक्षण अधिकारी,शाळा आणि विद्यार्थ्यांचे कौतुक राज्यभर समारंभपूर्वक विविध ठिकाणी केले जाईल. उद्योग जगताने शाळांना पुरस्कृत करावे म्हणून आम्ही प्रयत्न करीत आहोत, काहींनी त्यात रस ही दाखवला आहे." 

तसेच व्यक्तिगत स्तरावर ही कोणी आपल्या माजी शाळेला व मुलं जातात त्या शाळेला पुरस्कृत करू शकेल. किंवा किमान या उपक्रमात शाळांना सहभागी करून घेण्यासाठी साहाय्य करू शकतात. कचरा इतस्त फेकून सारा परिसर गलिच्छ करण्याच्या घाणेरड्या सवयीला आळा घालण्यासाठी एबीसीडीई फौंडेशन कंपन्या, स्वयंसेवी संस्था तसेच वयक्तिक लोकांना यात सहभागी होऊन समूह प्रयत्न्न करण्याचे आवाहन करत आहे. www.letschangeindia.net या संकेतस्थळावर उपक्रमाचे अधिक तपशील उपलबध आहे, असेही त्यांनी नमूद केले. 

Post a Comment

 
Top