Add

Add

0
 
पुणे(प्रतिनिधी):-''ग्रामीण भागातील दुर्लक्षित घटकांना पाच लाख घरकुले उपलब्ध करुन देण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. या योजनेमध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून आपले योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
कोरेगांव पार्क येथील हॉटेल वेस्टइन मध्ये गर्व्हर्निंग कौन्सिल मिटिंग ऑफ क्रेडाई नॅशनल ॲड द प्रेसिडेंटस कॉनक्लेव्ह कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत ते होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, क्रेडाई राष्ट्रीय अध्यक्ष गीतांबर आनंद, राज्याचे अध्यक्ष प्रशांत सरोदे, क्रेडाई पुण्याचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया, उपाध्यक्ष सतीश मगर आदिची प्रमुख पस्थिती होती.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाजातील एस.सी./एस.टी दुर्लक्षित वर्गासाठी 2022 पर्यत पाच लाख घरे उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. या महत्वपूर्व योजनेमध्ये सकारात्मक विचार करुन योगदान द्यावे यासाठी शासनाच्यावतीने आवश्यक मदत केली जाईल, अशी त्यांनी ग्वाही दिली.
 देशात सर्वत्र शहरीकरण होत आहे. यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे.देशाच्या विकासामध्ये रोजगार उपलब्धतेबरोबरच दरडोई उत्पन्न वाढविण्यामध्येच तसेच खऱ्या अर्थाने राष्ट्र उभारणीत आपला मोठा असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
देशातील बहुतांश लोक झोपडपट्टी भागात राहतात. त्या भागात पर्यावरण, जमीन, पाणी आदिंचे संवर्धन झाल्यास ते शाश्वत विकासाकडे वाटचाल करतील, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील सर्व जिल्ह्याचा विभागीय विकास आराखडा  डिसेंबर 2017 पर्यंत केला आहे, असेही ते म्हणाले.
राज्यातील अनेक इमारतीचे विकास आराखडे प्रलंबित असल्याचे दिसून येते. दीर्घकाळ प्रलंबित राहिलेले असे प्रस्ताव बांधकाम व्यावसायिक अथवा ग्राहकांसाठीही फायदेशीर ठरत नाहीत. शहरात इमारती वाढतात. मोकळ्या जागेवर अतिक्रमण होते. त्यामुळे मंजरीची प्रक्रिया गतीमान करुन त्वरित मंजूर करण्याचा निर्णय आता शासनाने घेतला आहे व त्याप्रमाणे मंजरी दिली जात आहे. सर्व प्रकारची मंजरी वेळेत मिळाली पाहिजे यासाठी सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी केली जात आहे. याद्वारे योग्य वेळेत, योग्य दरात, संबधित व्यक्तींना डिजिटल सेवेद्वारे माहिती उपलब्ध करुन दिली जात आहे.
महाराष्ट्रात अतिशय वेगाने शहरीकरण होत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबा आदि महत्वाच्या मेट्रो शहरात येत्या 6 ते 8 महिन्यात वाय-फाय सुविधा वाहतूक, पार्किंग आदि महत्वपूर्ण सेवा चांगली रितीने दिल्या जातील. पुण्यासारख्या स्मार्ट सिटीमध्ये महत्वपूर्ण घटक म्हणून आपले योगदान देवून शहराला स्मार्ट बनवावे असे आवाहन केले.
याप्रसंगी पालकमंत्री बापट यांनी पुणे शहरात PMRDA माध्यमातून परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध होण्यासाठी विविध महत्वपूर्ण निर्णय घेतले जात असल्याचे सांगितले.
यावेळी क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष गीतांबर आनंद, श्री सतीश मगर आदिंची समोचित भाषणे झाली.

Post a Comment

 
Top