Add

Add

0
मुंबई (प्रतिनिधी) -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात ‘सेवा दिवस’ साजरा करण्यात आला. नरिमन पॉईंट परिसरात स्वच्छता करणारे कर्मचारी तसेच कफ परेडच्या भाजी विक्रेत्या महिलांना यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते अपघात विम्याचे वाटप करण्यात आले.
  मुंबईत नरिमन पॉइंट येथील प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास प्रदेश संघटनमंत्री रवींद्र भुसारी, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, आमदार राज पुरोहित, प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा ॲड. माधवी नाईक, प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी, प्रवक्ते केशव उपाध्ये व माजी आमदार अतुल शाह उपस्थित होते. 
    मा.प्रकाश जावडेकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी गरिबीतून पुढे आले आहेत. त्यांना गरिबांविषयी कळवळा आहे. ते नेहेमी गरिबांविषयी विचार करतात. त्यांनी गरिबांना सामाजिक सुरक्षा मिळावी म्हणून रोज अवघा एक रुपया प्रिमियम भरून जीवन विमा योजना, महिना केवळ एक रुपया प्रिमियम भरून दोन लाख रुपयांचा अपघात विमा योजना आणि कष्टकऱ्यांसाठी अटल पेन्शन योजना सुरू केली आहे. पक्षाने मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त सफाई कामगारांना मोफत अपघात विमा भेट देऊन सेवा दिवस साजरा केला आहे. 

    पक्षाचे कार्यकर्ते हेमांग जांगला यांनी विमा योजनांची माहिती दिली. मा. मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त साप्ताहिक अर्जुन प्रतापचे प्रकाशन मा. जावडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी साप्ताहिकाचे संपादक अर्जुन गुप्ता उपस्थित होते.

Post a Comment

 
Top