Add

Add

0
पुणे(प्रतिनिधी):-दरवर्षी पुणे शहरात सुमारे 6 लाख गणेश मूर्तींची विक्री होते त्यापैकी 5 लाख गणेश मूर्ती ह्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असतात जे पाण्यात विरघळत नाही.त्यामुळे विहिरीत,तलावा त ,नद्यांमध्ये मूर्ती विसर्जन केल्याने मोठा प्रमाणात जल प्रदर्शन होते व लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होतो तसेच मूर्ती रंगवण्यासाठी वापरलेले घटक रासायनिक रंग पाण्यात मिसळून जलसुष्टीस प्रचंड हानी पोहोचते.
 यासर्व गोष्टींचा विचार करता एक सामाजिक बांधिलकीचे भान ठेऊन पुणे शहरातील झील एज्युकेशन सोसायटी यांचा पुढाकाराने पुणे महानगरपालिकाच्या हद्दीतील(जसे धायरी,कात्रज,सिंहगड़रोड,कर्वेन गरस्वारगेटटिळकरोड़,कोरेगाव पार्क) या परिसरातील 500घरामध्ये जाऊन अमोनियम बायकार्बोनेटेचे वितरण रहिवासीना करून जनगागृती केली.त्याचसोबत इको फ्रेंडली गणेश विसर्जनचे विविध फायदे जसे जल प्रदूषणात मोठा प्रमाणात प्रतिबंध,शास्त्रीय विघटनातून उरलेले कॅल्शिअम कार्बोनेटचे अनेक फायदे समजावून सांगितले.वरील उपक्रमामध्ये पुणे महानगरपालिका ,महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्यामुळे व नॅशनल केमिकल लॅब ,पुणे आणि कमिन्स इंडिया लिमिटेड यांचा संशोधनातून प्लास्टर ऑफ पॅरिसजे गणेश मूर्ती बनवण्यासाठी वापरतात ते अमोनियम बायकार्बोनेटच्या साहाय्याने सहज 36 -48तासांत विघटन करते हे सिद्ध केले.

सदर सामाजिक उपक्रमा मध्ये झील एज्युकेशन सोसायटीच्या विविध ज्ञान शाखेच्या विध्यार्थ्यानी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला यासाठी संस्थेचे संस्थापक संचालक श्री संभाजी काटकर व कार्यकारी संचालक श्री जयेश काटकर यांनी त्यांचे कौतुक केले.

Post a Comment

 
Top