Add

Add

0
जनतेने घाबरून  न जाण्याचे आवाहन... 

पुणे:- शहरातील रुबी हॉल,नायडू, व पुना रुग्णालयास पालकमंत्री गिरीश बापट यांनी भेट देवून चिकन गुनिया,डेग्यू रुग्णांची भेट घेवून विचारपूस करुन संवाद साधला. खाजगी रुग्णालयात तसेच मनपा रुग्णालयात औषधसाठा पुरेसा आहे. हा रोग बरा होवू शकतो. रुग्णांनी  घाबरुन जावू नये असेआवाहन केले.
याबाबत स्वच्छता राखणे हाच उपाय आहे. तसेच जास्त दिवस पाणी साठवू नये.याबाबत मनपाकडून संबंधित विभागाकडून जनजागृती केली जात आहे. तसेच या रोगाबाबतचे लक्षणे दिसूनआल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय अधिकारी यांना वस्तूस्थिती सांगून उपचार घ्यावा. याबाबत सर्वत्र वैद्यकीय अधिकारी चांगले काम करीत असल्याचे दिसून आले आहे. तसेच सर्व संबंधित डॉक्टरांना सर्तक राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मनपा व शासनस्तरावरुन आवश्यक मदत केली जात असल्याचे सांगितले.
याप्रसंगी पालकमंत्री बापट यांनी विविध रुग्णातील रुग्णांशी संवाद साधुन विचारपूस केली. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करुन दररोज किती रुग्ण येत आहेत, उपचारासाठी किती दाखल आहेत, पॉझि टिव्ह रुग्ण किती आहेत, कोणत्या भागातीलआहेत, त्यावर काय उपचार केले जात आहेत. याबाबत माहिती घेतली.

सर्वसामान्य रुग्णांसाठी मनपाच्या नायडू व कमला नेहरु रुग्णालयात व्यवस्थित उपचार केले जात आहेत. सर्वांनी मिळून या संकटाचा मुकाबला केला पाहिजे. याबाबत तज्ञांकडून व शासनाकडून प्राप्त झालेल्या सूचनेचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री बापट यांनी केले.

Post a Comment

 
Top