Add

Add

0
'गणेशोत्सव पर्यावरणपूरकता जपल्याबद्दल खा वंदना चव्हाण यांनी केले पुणेकरांचे अभिनंदन' 
पुणे :-पुण्यातील पाच मानाच्या गणपतींचे विसर्जन कृत्रिम हौदात करण्याच्या निर्णयाचे पुणे शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने स्वागत करण्यात आले असल्याचे खासदार, शहरा ध्यक्ष अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
यंदाच्या वर्षी अनेक पुणेकरांनी घरगुती गणपती विसर्जन देखील घरच्या घरीच केले. पर्यावरणाचा समतोल साधण्या साठी थर्माकोलचा वापर कमी केला. अनेक मंडळांनी जीवंत देखावे सादर करून समाज प्रबोधन करण्यावर भर दिलेला दिसला. या सर्व गोष्टी पाहून समाधान वाटत आहे.  पुणेक रांची पर्यावरणपूरक चळवळ अशीच चालू राहावी व वाढावी यासाठी  पुणेकरांना खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात शुभेच्छा दिल्या आहेत. 
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा हा आग्रह पुणे शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसचा नेहमीच होता आणि राहील. तीन वर्षांपूर्वी सर्वप्रथम इको फ्रेंडली गणपती बनवण्याची कार्यशाळा शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली होती. 
तसेच या वर्षी खा. वंदना चव्हाण यांनी कसबा, पर्वती, कॅन्टॉन्मेंट, शिवाजीनगर, हडपसर या पाच विधानसभा मतदार संघातील गणेश मंडळांना भेटीदरम्यान मंडळांच्या अध्यक्षांना पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करा अश्या आशयाचे आवाहन पत्र दिले होते. एकोपा आणि पर्यावरण रक्षण याबाबी लक्षात घेऊन गणेशोत्सव साजरा करणार्‍या गणेश मंडळांच्या अध्यक्षांचा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गेली दोन वर्ष सत्कार केला जात आहे. 

Post a Comment

 
Top