Add

Add

0

          संत गुलाबराव महाराज साहित्य संमेलनात उहापोह... 

नवी दिल्ली,(प्रतिनिधी):-“आपल्या देश आध्यात्मिक विचारांवर आधारलेला आहे. कुंभमेळा, पंढरीची वारी, गणेशोत्सव अशा प्रकारच्या अनेक उत्सवांनी येथील तीर्थक्षेत्रे उजळून निघतात. येथे येणार्‍या लाखो भाविक-भक्तांपर्यंत ज्ञानाची गंगा पोहोचवण्यासाठी विज्ञान-अध्यात्माच्या समन्वयातून निर्माण झालेल्या साहित्याचा प्रसार होण्यासाठी ही सर्व तीर्थक्षेत्रे ज्ञानतीर्थक्षेत्रे व्हावीत,” अशी अपेक्षा नवव्या श्री संत गुलाबराव महाराज साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केली.
श्री संत गुलाबराव महाराज सर्वोदर ट्रस्ट, आळंदी, पुणे, विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआरटी, पुणे आणि इंडिरा इंटरनॅशनल मल्टिर्व्हसिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रज्ञाचक्षु समन्वयमहर्षि श्री संत गुलाबराव महाराज जीवन शताब्दी महोत्सवानिमित्त त्रांच्रा साहित्रावर आधारित, ऐतिहासिक स्वरूपाच्रा दोन दिवसीय 9 व्या साहित्र संमेलनाचे विज्ञान भवन, नवी दिल्ली रेथे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
या संमेलनाच्या दुसर्‍या दिवशीच्या सत्रात ‘तीर्थक्षेत्रांकडून ज्ञानतीर्थ क्षेत्रांकडे’ या विषयावरील परिसंवादात डॉ. विजय भटकर अध्यक्ष स्थानावरुन बोलत होते. यामध्ये माजी सनदी अधिकारी डॉ. अविनाश धर्माधिकारी, आळंदी येथील नारायण महाराज जाधव, भगवद्गीतेचे अभ्यासक डॉ. संजय उपाध्ये, श्री वारकरी प्रबोधन महासमितीचे अध्यक्ष रामेश्‍वर शास्त्री, साहेबराव मोरे आदी सहभागी झाले होते. स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड व कार्याध्यक्ष नारायण महाराज मोहोड उपस्थित होते.
डॉ. भटकर म्हणाले, “गुलाबराव महाराजांनी सर्व विषयांना हात घातलेला आहे.ज्या गोष्टींची उकल विज्ञाला करता आलेली नाही, त्याची उकल महाराजांनी केली आहे. संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम,गुलाबराव महाराज यांच्यासह अनेक संतांनी जीवनाचा आदर्श मार्ग दाखविला आहे. हा आदर्श विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी या तीर्थक्षेत्रांना ज्ञानतीर्थ क्षेत्रांमध्ये रुपांतरित केले पाहिजे.”
डॉ. अविनाश धर्माधिकारी म्हणाले, “आपली भारतमाता हीच एक तीर्थक्षेत्र आहे. येथील प्रत्येक ठिकाण ज्ञानाचे दालन होऊ शकते. त्या माध्यमातून सर्वांपर्यंत आनंदी, सुखी जीवनाचा विचार पोहोचवता येणे शक्य आहे. सर्व शाळा, महाविद्यालये ही ज्ञानमंदिरे आहेत. त्यांनाही तीर्थक्षेत्रांचे रुप आले पाहिजे. त्यातील चांगल्या संस्का रांमुळे चारित्र्यवान युवक घडेल.”
डॉ. संजय उपाध्ये यांनी एकाचवेळी अनेकांना शिक्षण देण्याची संधी तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असल्याचे नमूद केले. वारकरी संप्रदाय नेहमीच लोकशिक्षणासाठी पुढाकार घेईल, असे आश्‍वासन रामेश्‍वर शास्त्री यांनी दिले. आळंदी, देहू, पंढरपूर येथे येणार्‍या लाखो भाविकांना जीवनमूल्ये सांगण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे नारायण महाराज जाधव म्हणाले.साहेबराव मोरे यांनीही तशाच भावना व्यक्त केल्या. पहिल्या सत्राचे सूत्र संचालन प्रा. सुधीर राणे यांनी केले.
‘सर्व धर्मग्रंथ हे खर्‍या अर्थाने जीवनग्रंथ आहेत’ या विषयावरील परिसंवादाचे अध्यक्षस्थान प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी भूषविले. राष्ट्रीय मुस्लिम मंचाचे अध्यक्ष इंद्रेशकुमार, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु यांनी डॉ. एस. एन. पठाण, एमआयटीतील प्राध्यापक मिलिंद पत्रे आणि किसन शर्मा यांनी या सत्रात आपले विचार मांडले.
इंद्रेशकुमार म्हणाले, “शिक्षणात संस्कार, रोजगारात देशप्रेम आणि समाजसेवा असावी. गरीबांचा तिरस्कार, अपमान करता कामा नये. कारण प्रत्येक धर्मात व धर्मग्रंथात सर्वजण एकाच ईश्‍वराची लेकरे आहेत, अशी शिकवण आहे. प्रत्येक धर्मात चांगली-वाईट अशी व्यवस्था आहे. विविधतेत एकता असणारा आपला जगात एकमेव देश आहे. त्यामुळे एकमेकांना कमी लेखण्यापेक्षा सर्व समान आहेत, या भावनेने जगले पाहिजे.”
डॉ. एस. एन. पठाण म्हणाले, “सर्व धर्मग्रंथांतून जीवन कसे जगावे आणि कसे जगू नये, याचा संदेश दिला आहे. ईश्‍वराची नावे वेगवेगळी असली, तरी अंतिमत: ईश्‍वर एकच आहे. हिंदू धर्मातील सूर्यनमस्कार म्हणजेच मुस्लिम धर्मातील नमाज आहे. सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास केला, तर आपल्या लक्षात येईल की, हे सर्व एकच आहे.”
किशन शर्मा आणि प्रा. मिलिंद पत्रे यांनीही धर्मग्रंथातून मानवतेचा आणि बंधुभावाचा मार्ग दाखविला असून, आपण प्रत्येकाने त्याच मार्गावर चालले पाहिजे, असे नमूद केले. या सत्राचे सूत्रसंचालन प्रा. गौतम बापट यांनी केले.
‘संत साहित्यातील विज्ञान आणि अध्यात्माचे दर्शन’ या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी अयोध्या येथील रामजन्मभूमी शिलान्यासाचे कार्याध्यक्ष डॉ. रामविलास वेदांती हे होते. संस्कृतचे गाढे अभ्यासक पंडित वसंतराव गाडगीळ, वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज जवंजाळ आणि विज्ञान व अध्यात्माचे अभ्यासक डॉ. शिवाजी शिंदे यांनी सत्रात आपले विचार मांडले.
पंडित वसंतराव गाडगीळ म्हणाले, “संत गुलाबराव महाराजांचे साहित्य क्रांतीकारी असून, त्यामध्ये विज्ञान व अध्यात्माचा अचूक योग साधला आहे. त्यांचे हे साहित्य पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट व्हावे. त्यातून येणार्‍या पिढीला साहित्यातील विज्ञान व अध्यात्माचे दर्शन घडेल.”
डॉ. शिवाजी शिंदे म्हणाले की, विज्ञान आणि अध्यात्म हे एकच आहेत. विज्ञानाचा सखोल अभ्यास केला, तर एका क्षणाला त्यातील अध्यात्माचे दर्शन घडते. संत साहित्यात विज्ञानवादी दृष्टिकोन व आध्यात्मिक अधिष्ठान असल्याचे दिसते. विज्ञान व अध्यात्माची सांगड असलेल्या संत साहित्याचा प्रसारासाठी वारकरी महामंडख नेहमीच प्रयत्नशील असल्याचे प्रकाश महाराज जवंजाळ म्हणाले. डॉ. रामविलास वेदांती यांनी अध्यक्षीय मनोगत मांडले. या सत्राचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. मिलिंद पांडे यांनी केले.

Post a Comment

 
Top